बलात्काराच्या घटनेने पुणे हादरले!धक्कादायकबाब म्हणजे वडील व भावानेच केला मुलीवर बलात्कार
पुणे – मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने पुणे हादरले आहे. दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना ताजी असताना आज आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे . शहरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.धक्कादायकबाब म्हणजे वडील व भावानेच मुलीवर बलात्कार केला आहे. एवढंच नव्हेतर मामांकडूनही मुलीवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. याप्रकरणी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी मूळची बिहारची असून पुण्यात शिक्षणासाठी आली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा तपास बंडगार्डन पोलीस आहेत.दुसरीकडे काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड येथील दिघी परिसरात मजूर महिलेच्या दोन वर्षीय चिमुरडीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. आरोपीने पीडित मुलीला बिस्किट खायला देतो म्हणून घेऊन गेला. अन लष्कर परिसरातील जंगलात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर याबबात घरी काहीही सांगू नये म्हणून मुलीला धमकी देता तिला मारहाण ही केली. त्यानंतर घरी आल्यानंतर मुलीचा व चेहरा सुजलेला दिसला तसेच तिच्या वर्तनात ही बदल झाल्याचा आढळून आला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तिला गोडेबोलून विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने पोलीस स्टेशनात तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पोलीस प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनत चालला आहे.
0 Comments