चिंचोली तलावाजवळील सांगोला-महुद रस्ता अपघाताला देतोय निमंत्रण ; पुलाची संरक्षक भिंत पडल्याने जिवीतहानी होण्याची शक्यता !
सांगोला-महुद रोडवर चिंचोली तलावाजवळ असणाऱ्या पुलाचे संरक्षक भिंत (कटडे ) तुटल्यामुळे व या ठिकाणचा रस्ता खचून या ठिकाणी पडलेल्या मोठमोठे खड्डे चुकवण्यासाठी वहान चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणचा रस्ता खराब झाल्याने वहानांच्या रहदारी मुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुळ निर्माण होत आहे.
या धुळीमुळे वहान चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी आजवर अनेक वेळा छोटे मोठे अपघात घडलेले आहेत.
सांगोला येथून पुणे, मुंबई अशा लांब पल्याच्या बसेस या मार्गाने धावत असतात तसेच या मार्गाने ट्रक कंटेनर चारचाकी दुचाकी अशा प्रकारच्या वहानांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते.चिंचोली तलावाजवळील रस्ता खचल्याने या ठिकाणी वारंवार वहातुक कोंडी निर्माण होत आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने या ठिकाणचा रस्ता दुरुस्तकरून या ठिकाणच्या पुलाची संरक्षक भिंत बांधावी. अशी मागणी वहान चालकामधून होत आहे.


0 Comments