google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ! शिवाजीनगर परिसरातील शाळेत भरदिवसा घुसून शाळेचा वॉचमन निघाला नराधम ; पोलिसांकडून अटक

Breaking News

धक्कादायक ! शिवाजीनगर परिसरातील शाळेत भरदिवसा घुसून शाळेचा वॉचमन निघाला नराधम ; पोलिसांकडून अटक

      धक्कादायक ! शिवाजीनगर परिसरातील शाळेत भरदिवसा घुसून शाळेचा वॉचमन निघाला नराधम ; पोलिसांकडून अटक

पुणे :  ओळख असल्याचा बहाणा करुन ११ वर्षाच्या मुलीला शाळेच्या बाथरुममध्ये  नेऊन तिच्यावर बलात्कार  केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शिवाजीनगर  परिसरातील एका मुलींच्या शाळेत बुधवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. 


याप्रकरणी डेक्कन परिसरात राहणार्‍या एका ४० वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ११ वर्षाची मुलगी शाळेत गेली होती. यावेळी एक जण शाळेत आला व त्याने या मुलीशी ओळख असल्याचा बहाणा करुन तिला ढकलत ढकलत शाळेच्या बाथरुममध्ये नेले. तेथे तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला . त्यानंतर बाहेर कुणाला काही सांगितलेस तर बघ अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.


या घटनेनंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांच्या  कानावर ही घटना टाकली. त्यांनी मुलीच्या आईला व पोलिसांना बोलावून याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे  यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी शाळेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनिषा जाधव अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments