घरासमोर महागड्या गाड्या , दोन-दोन मजली माड्या,तरीही अन्नसुरक्षा योजनेचा लाभार्थी
सांगोला तालुक्यातील अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थींच्या घरासमोर महागडी गाड्या , दोन-दोन मजली पक्की घरे , तरीही अशी अनेक धनदांडगे लोक रेशन दुकानांसमोर रेशनचे धान्य घेण्यासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पात्र लाभार्थ्यांचा धान्याचा लाभ मिळावा , गोरगरिबांपर्यंत अन्नधान्य पोहोचावे यासाठी शासनाने स्वस्त दरात धान्य मिळावे यासाठी अन्नसुरक्षा योजना राज्य शासनाकडून राबविली जाते . केंद्राकडूनही मोफत धान्य दिले जाते.अन्नसुरक्षा योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना सर्वांना लाभदायी अशीच आहे . परंतु काही धनदांडगे लोक शासनास चुकीची आणि खोटी माहिती देऊन अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
अश्या प्रकारे बेकायदेशीर रित्या अन्नसुरक्षा योजनाचा लाभ घेणारे धनदांडगे लोक शोधून काढण्याचे काम यंत्रणेचे आहे . मात्र , अशा प्रकारची मोहीमच शासनाकडून राबविली जात नसल्याने या धनदांडग्या लोकांना रेशनचा पुरवठा गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. रेशनवरील धान्य घेणाऱ्या अनेकांचे वार्षिक उत्पन्न हे अवघे ४५ ते ५९ हजारांपर्यंतच असल्याची अनेक कार्डधारक आहेत .
त्यांच्या सामाजिक परिस्थितीकडे पाहिले तर त्यांचे वार्षिक उत्पन्न खरेच इतके कमी असेल का ? असा प्रश्न कुणालाही पडावा असाच आहे . परंतु , याबाबत तपासणी होतच नाही .त्यामुळे अशी धनदांडगे लोक शासनाच्या अन्नसुरक्षा योजनाचा फायदा घेत आहेत.शासनाने अश्या धनदांडग्या लोकांचा शोध घेवुन त्यांची नावे अन्नसुरक्षा योजनेतून कमी करून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी.


0 Comments