google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग | दोन दिवसीय भारत बंदची घोषणा

Breaking News

ब्रेकिंग | दोन दिवसीय भारत बंदची घोषणा

 ब्रेकिंग | दोन दिवसीय भारत बंदची घोषणा

1. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटनांनी दोन दिवसीय भारत बंदची घोषणा केली आहे . या भारत बंद आणि संपात सहभागी होण्याचा निर्णय बँक संघटनांनी घेतला आहे . 2. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण 


आणि बँकिंग कायदा 2021 च्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे . स्टेट बँकेने ग्राहकांना कळवले आहे की , 28 ते 29 मार्च दरम्यान बँकिंग सेवा प्रभावित होणार आहेत . 3. सरकारची धोरणे कर्मचारीविरोधी असल्याचे सांगत जॉइंट फोरम ऑफ सेंट्रल ट्रेड युनियन्सने सोमवार ऑणि मंगळवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे .


 4. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने या संपाला पाठिंबा दिला आहे . या कर्मचारी संघटनांची बैठक झाली . सर्व राज्यांतील त्यांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर दोन दिवस संपाची घोषणा करण्यात आली आहे 

 5. केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी , शेतकरी विरोधी , जनता विरोधी आणि देशद्रोही धोरणांच्या विरोधात हा संप करत असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे . सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्याखाजगीकरणाविरोधात बॅक संघटना आपला निषेध व्यक्त करणार आहेत .


 सरकारने 2021 च्या अर्थसंकल्पात आणखी दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली होती . बँकेत असे अनेक कर्मचारी आहेत , जे निवृत्त होणार आहेत , त्यांनी संपात सहभागी झाल्यास त्यांच्या सेवा सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही . कोळसा , पोलाद , तेल , दूरसंचार , टपाल विभाग आणि विमा विभागाशी संबंधित कर्मचारीही या संपात सहभागी होण्याची शक्यता आहे .

Post a Comment

0 Comments