google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुलाने दिली साक्ष आणि पित्याला झाली जन्मठेपेची शिक्षा !

Breaking News

मुलाने दिली साक्ष आणि पित्याला झाली जन्मठेपेची शिक्षा !

 मुलाने दिली साक्ष आणि पित्याला झाली जन्मठेपेची शिक्षा !

लातूर : आठ वर्षाच्या मुलाने न्यायालयात दिलेल्या साक्षीवर त्याच्या पित्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पत्नीचा गळा चिरून पत्नीचा खून  केल्याच्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तुंगी येथे २०१८ साली मेहबूब हुसेन मुळ्जे या २५ वर्षे वयाच्या तरुणाने आपली पत्नी  सबिया हिचा गळा चिरून खून केला असल्याचा आरोप मेहबूब याच्यावर होता. चारित्र्याच्या संशयावरून मेहबूब याने आपल्या लहान मुलाच्या डोळ्यादेखत पत्नीचा गळा चिरला होता त्यामुळे या घटनेतील मुख्य आणि अत्यंत महत्वाचा साक्षीदार हा मेहबूब याचा लहान मुलगाच  होता. या खटल्यात दहा जणांची शिक्षा न्यायालयात नोंदविण्यात आली परंतु घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या लहान मुलाची साक्ष न्यायालयात अत्यंत महत्वाची ठरली. या साक्षीवर न्यायालयाने मेहनुब याला जन्मठेप सुनावली आहे.


चाकूने चिरला गळा !

मेहबूब आणि त्याची पत्नी सबिया यांच्यात नेहमीच भांडण होत होते. पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत मेहबूब आपल्या पत्नीला नेहमीच मारहाण करीत होता. १ नोव्हेंबर २०१८ रोजी देखील त्यांच्यात असेच भांडण सुरु झाले आणि हे भांडण वाढत गेले. मेहेबुब याने धारदार चाकूने थेट आपल्या पत्नीचा गळा चिरला आणि यात साबियाचा मृत्यू झाला. गळा चिरताच ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तिचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे हा प्रकार घडताना त्यांचा मुलगा तेथेच होता आणि संपूर्ण घटना त्याच्या डोळ्यादेखत घडली होती. 


मुलाची साक्ष महत्वाची

सदर प्रकरणी पोलिसांनी मेहबूब याला अटक करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात गेल्या चार वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरु होती. या सुनावणीत एकूण दहा जणांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या यात मेहबूब आणि साबिया यांच्या थोरल्या मुलाने न्यायालयात साक्ष दिली आणि ही साक्ष खटल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरली. सदर खटल्याची सुनावणी होऊन न्यायालयाने मेहबूब याला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.  


मुलाचे दुर्दैव !

पित्याने डोळ्यादेखत आईचा गळा चिरून खून केला त्यामुळे आईविना जगण्याचे त्याच्या नशिबात आले होते. आता आपल्याच साक्षीने आपल्या पित्याला जन्मठेप झाली आणि पित्याचे छत्र देखील तुरुंगात गेले अशी दुर्दैवी वेळी मेहबूब आणि सबिया यांच्या मुलावर आली आहे. बापाने आईवर घेतलेला संशय अत्यंत विनाशकारी ठरला आणि मुलांच्या नशिबी मात्र वनवास आणला. मुलाने दिलेल्या महत्वपूर्ण साक्षीवरच पिता मेहबूब याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.   घटना घडलेल्या तुंगी गावात आणि लातूर जिल्ह्यात देखील या खटल्याची आणि मेहबूबला झालेल्या शिक्षेची चर्चा होऊ लागली आहे.

Post a Comment

0 Comments