google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एका महिलेने आपल्या पतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी खाटीकाला बोलावलं. त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले.

Breaking News

एका महिलेने आपल्या पतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी खाटीकाला बोलावलं. त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले.

 एका महिलेने आपल्या पतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी खाटीकाला बोलावलं. त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले.

मध्य प्रदेशातील  इंदूरमध्ये हादरवणारा प्रकार समोर आला आहे. येथे एका महिलेने आपल्या पतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी खाटीकाला बोलावलं. त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले. त्यापैकी धड घराजवळ दफन केलं आणि हात-पाय जंगलात फेकून दिले. थरकाप उडवणारा हा प्रकार उघड झाल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 20 दिवसांपूर्वी ट्रक चालक कृष्णाची हत्या करण्यात आली. त्याची पत्नी सपनाने (40) ही हत्या केली होती. इतकच नाही तर गावातील खाटीकांना बोलावलं आणि पतीच्या मृतदेहाची तुकडे करून घेतले. या सर्व प्रकारानंतर आरोपी महिला आणि तिचा मुलगा रिमांडमध्ये आहेत. पोलिसांनी खाटीक रिजवान कुरेशी आणि भय्यू कुरेशीला अटक केली आहे. आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, देव गुराडियाजवळील जंगलात शरीरातील इतर अवयव फेकले आहेत. 


तपासानंतर पोलिसांना रक्ताने माखलेली प्लास्टिकची पिशवी मिळाली. मात्र यात एकही अवयव नव्हता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर महिलेने सांगितलं की, तिला या हत्येबाबत अजिबात दु:ख नाही. हत्या नाही तर काय करू शकले असते मी? असा सवाल तिने पोलिसांसमोर केला. मृतदेह कापल्यानंतर दोन्ही खाटीत एका मशिदीत लपले होते. पोलिसांची सूचना मिळताच ते तेथून पळाले. शेवटी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं.शुक्रवारी काढला होता दफन केलेला मृतदेह...


5 फेब्रुवारी रोजी आरोपी महिलेने दाल-बाटी केली होती, तिने डाळीत झोपेच्या पाच गोळ्या आधीच टाकल्या होत्या. पती झोपताच रिजवान आणि भय्यूने त्याला मारून टाकलं. त्याचे हात-पाय पिशवीत भरले होते. यासाठी तिने मुलाची मदत घेतली होती. सपनाने 6 फेब्रुवारी रोजी शेजारच्यांना बाहेर जात असल्याचं सांगितलं. तिने पतीचं धड प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून ठेवलं होतं 


आणि वरुन भांडी ठेवली होती. सेप्टिक टँकची दुरुस्ती करायचं सांगून तिने सहा फूट खड्डा खोदण्यासाठी मजुरांना बोलावलं. आणि पतीचा मृतदेह खड्ड्यात टाकून मीठासोबत दफन केला.मिळालेल्या माहितीनुसार, खाटीकांचे सपनासोबत अवैध संंबंध होते. यामुळे कुटुंबासह ती दुसऱ्या ठिकाणी राहायला आली होती. कृष्णाच्या हत्येत त्याचा 19 वर्षीय मोठा मुलगाही सहभागी होता.

Post a Comment

0 Comments