कष्ट,जिद्द आणि चिकाटीने सांगोला तालुक्याची प्रतिकुल परिस्थितीवर मात
भरपूर कष्ट करण्याची तयारी, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सांगोला तालुक्याने प्रतिकुल परिस्थितीवर मात केली आहे असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री आ.सुभाष बापू देशमुख यांनी केले. लोकमंगल पतसंस्था व लोकमंगल बँक सांगोला शाखेच्या वतीने आयोजित
सल्लागार,ठेवीदार,कर्जदार व हितचिंतकाच्या स्नेहसंवाद मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पतसंस्थेचे संचालक युवराज नाना गायकवाड, माजी नगरसेवक अँड.गजानन भाकरे, डॉ. शिवराज भोसले,डॉ.पांडूरंग गव्हाणे,सौ.वैशाली सावंत आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. सुभाष बापु देशमुख म्हणाले की, सांगोला तालुक्यातील नागरीकांनी लोकमंगल परिवारावर मोठया प्रमाणावर विश्वास व प्रेम व्यक्त केले आहे.तालुक्यातील डाळींब उत्पादक शेतकरी व त्यावरील आधारीत व्यवसायिक घटक सध्या अडचणीत आलेले आहेत त्या संदर्भात सर्वंकष माहीती घेवुन पावले उचलणार आहे.
यावेळी लोकमंगल पतसंस्थेच्या नवनियुक्त स्थानिक सल्लागारांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्यास मोठया संख्येने सल्लागार,ठेवीदार, कर्जदार व हीतचिंतक उपस्थित होते. यावेळी लोकमंगल फाऊंडेशन अन्नपूर्णा योजनेस मदत म्हणून
श्री. महेश नलवडे श्री विष्णू नरळे श्री. माळी वसंत यांनी मदत केली. तसेच मेळावा पार पाडण्यासाठी विभागीय अधिकारी दिपक नागणे, जुनोनी शाखाधिकारी हणमंत गिरी व पतसंस्था व बँकेचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.आनंदा आलदर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश बनकर यांनी केले.

0 Comments