गेली २५ वर्षापासूनची गळवेवाडी ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची तहान दिपकआबांच्या प्रयत्नामुळे भागणार..!गेली २५ वर्षापासूनची गळवेवाडी ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची तहान दिपकआबांच्या प्रयत्नामुळे भागणार..!
अखेर गळवेवाडी ग्राम पंचायतीचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेत समावेश ; ४७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा आबांच्याहस्ते शुभारंभ
सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला आणि जत तालुक्याच्या सीमेवर असलेले गळवेवाडी हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेत समाविष्ट होण्यासाठी संघर्ष करत होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सभापती अनिल मोटे यांच्या
माध्यमातून गळवेवाडी गावाचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेत समावेश करून या गावासाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तब्बल 47 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामधून गळवेवाडी गावासाठी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन व स्वतंत्र पाण्याची टाकी करण्यात येणार आहे या कामाचा रविवार दि 28 फेब्रुवारी रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सभापती अनिल मोटे, सतीश काशीद, डिकसळचे सरपंच चंद्रकांत कारंडे, महादेव काशीद, विजय पवार, सोनंदचे उपसरपंच साहेबराव काशीद, गळवेवाडीचे सरपंच विकास गळवे, उपसरपंच विशाल गळवे माजी सरपंच मधुकर गळवे, कोंडीबा गळवे, अर्जुन गळवे, माजी उपसरपंच मधुकर गळवे, रघुनाथ गळवे, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गळवे, सचिन शिंदे, कुंडलिक गळवे, तानाजी महाडिक, अल्ताफ पठाण, विकास सेवा सोसायटीचे सदस्य म्हातारबा गळवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
आशिया खंडातील सर्वात मोठी पिण्याच्या पाण्याची योजना म्हणून सर्वत्र ओळखली जाणारीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेची शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सांगोला तालुक्यातील 84 गावांसाठी कार्यान्वित आहे. या योजनेत गळवेवाडी गावचा समावेश व्हावा ही येथील नागरिकांची गेल्या २०-२५ वर्षांपासूनची आग्रही मागणी होती परंतु, तालुक्यातील सत्ताधारी मंडळींनी याकडे दुर्लक्ष केल्याने गळवेवाडी गावातील सुमारे एक हजार नागरिक पिण्याच्या पाण्याच्या प्रतिक्षेत होते
सदरची बाब येथील नेतेमंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अनिल मोठे यांना सदर प्रकरणात लक्ष देऊन तात्काळ गळवेवाडी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा अशी सूचना दीपक आबांनी दिली होती.
यानुसार सभापती मोठे यांनी सातत्याने संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून गळवेवाडी गावाचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेत समावेश करून जल जीवन मिशन अंतर्गत गावासाठी तब्बल 47 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. या कामाचे रविवार दि 27 रोजी भूमिपूजन झाल्याने अवघ्या काही दिवसात गळवेवाडीकरांचा २५ वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.
अनेक वर्ष राजकीय नेतेमंडळी व प्रशासकीय कार्यालयात हेलपाटे मारूनही गळवेवाडी गावचा प्रश्न प्रलंबित राहिला होता अखेर दीपक आबांच्या पुढाकाराने व सभापती अनिल मोठे यांच्या प्रयत्नातून हा वर्षानुवर्षाचा प्रश्न निकाली निघाल्याने गळवेवाडी ग्रामस्थांनी दीपक आबांचे आभार मानले.

0 Comments