अभिनेता सलमान खानानं सोनाक्षीसोबत उरकलं गुपचूप लग्न? सोशल मीडियावर व्हायरल फोटोने घातला धुमाकूळ
बॉलीवूडमधील सुपरस्टार सलमान खानचा चाहता वर्ग मोठा आहे. सलमान खान सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसला तरी, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चाहत्यांच्या चर्चेत येतो. तसेच तो खाजगी आयुष्य सोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा चाहत्यांच्या सतत चर्चेत पाहायला मिळत.
अलीकडेच सलमान खान बद्दल एक अफवा चांगलीच रंगली होती. सलमाननं सर्वांच्या नकळत गुपचुप लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तसेच त्याच्या लग्न सोहळ्याचे काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली होती. त्यामुळे सलमाननं गुपचूप लग्न केल्याच्या बातमीवर अनेक लोकांनी विश्वास ठेवायला सुरुवात देखील केली होती .मात्र, सत्य जाणून घेता सलमान खान आणि त्याची सहकलाकार अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा आगामी चित्रपट 'दबंग द टूर रिलोडेड'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ते दोघं दुबईमध्ये एकत्र एका इवेन्टला गेले आहेत. त्यामुळं त्याच्या आणि सोनाक्षीच्या लग्नाचे व्हायरल झालेले हे फोटो Edite केलेले आणि खोटे असल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान, सलमान खानच्या चाहत्यांना सतत भाईजान लग्न कधी करणार हा प्रश्न त्रस्त करत आहे. तर त्यानं गुपचुप लग्न केलं, ही अफवा पसरल्यानंतर त्याच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला होता.

0 Comments