google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पंचायत समितीच्या आमसभेचे २ ९ मार्च रोजी आयोजन

Breaking News

सांगोला पंचायत समितीच्या आमसभेचे २ ९ मार्च रोजी आयोजन

 सांगोला पंचायत समितीच्या आमसभेचे २ ९ मार्च रोजी आयोजन

सांगोला ( प्रतिनिधी ) : कोरोनामुळे तब्बल २ वर्ष रखडलेल्या सांगोला पंचायत समितीच्या आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे . पंचायत राज समितीच्या शिफारशीनुसार सांगोला पंचायत समितीची सन २०२१-२२ ची आमसभा मा . आम . शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि . २ ९ मार्च रोजी सकाळी १०.०० वाजता बचत भवन पंचायत समिती सांगोला येथे आयोजित करण्यात आली आहे .- सदर आमसभेमध्ये विविध विषयावर चर्चा होणार आहे . यामध्ये मागील सभेचे कार्यवृत्तांत वाचून कायम करणे ,


 सन २०२१-२२ मध्ये केलेल्या कामाचा आढावा घेणे , सन २०२२ - २३ मध्ये करावयाच्या कामाचे नियोजन करणे , अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळी या विषयावर चर्चा करणे , आयत्या वेळचे विषय किंवा सूचना / मागण्यास सभेपूर्वी दोन दिवस अगोदर पंचायत समिती कार्यालयात आणून द्याव्यात असे आवाहन प्रशासक तथा गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments