google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग बातमी खासगी सावकारी प्रकरणी महिलेस अटक; महिना २० टक्के व्याजाने कर्ज दिले आणि...

Breaking News

ब्रेकिंग बातमी खासगी सावकारी प्रकरणी महिलेस अटक; महिना २० टक्के व्याजाने कर्ज दिले आणि...

 ब्रेकिंग बातमी खासगी सावकारी प्रकरणी महिलेस अटक; महिना २० टक्के व्याजाने कर्ज दिले आणि...

              

खासगी सावकारी प्रकरणी महिलेस अटक; महिना २० टक्के व्याजाने कर्ज दिले आणि...

कोल्हापूर: जुना राजवाडा पोलिसांनी खासगी सावकारी प्रकरणी संशयित महिलेला अटक केली आहे. मंगल शिवाजी चौगुले राहणार टिंबर मार्केट असे तिचे नाव आहे.


जुना राजवाडा पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. टिंबर मार्केट परिसरातील अलका कांबळे यांनी २०१९ मध्ये औषधोपचारासाठी संशयित मंगल चौगुले यांच्याकडून प्रतिमहिना २० टक्के व्याज दराने ३५ हजार रुपये घेतले. कांबळे यांनी चौगुले यांना व्याजापोटी दोन लाख ४५ हजार रुपये दिले. 


तरीही चौगुले यांनी कांबळे यांच्याकडे वसुलीसाठी तगादा सुरू केला. कांबळे यांच्याकडून ५६ हजार रुपये येणे बाकी असून त्या वसुलीसाठी त्यांनी दमदाटी केली, अशी फिर्याद कांबळे यांनी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी खासगी सावकारकी प्रकरणी मंगल चौगुले हिच्यावर गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे. कोर्टाने तिला २२ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली

Post a Comment

0 Comments