धक्कादायक ! ठाण्यात विवाहितेसोबत पतीसह सासऱ्याचं विकृत कृत्य ; नग्न फोटो केले व्हायरल
मीरा रोड, ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीसोबत विकृत कृत्य केलं आहे. पतीचे अनैतिक प्रेमसंबंध उघडकीस आल्यानंतर आरोपी पतीने आपल्या पत्नीचेच नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.
या प्रकरणी पीडित महिलेनं मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमाअंतर्गत पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय पीडित विवाहितेचं फेब्रुवारी 2018 मध्ये पुण्यातील जुन्नर परिसरातील रहिवासी असणाऱ्या 28 वर्षीय युवकासोबत विवाह झाला होता. पती हा नवी मुंबईतील एका आयटी कंपनीत नोकरीला होता.
तर पीडित महिला ही देखील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. दरम्यान एकेदिवशी पीडित पत्नीने आपल्या पतीचा मोबाइल तपासला असता, त्याचे दुसऱ्या एका तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध सुरू असल्याची माहिती मिळाली.पतीच्या अनैतिक संबंधाचा भांडाफोड झाल्यानंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले.
यानंतर आरोपी पतीनं देखील पत्नीवर चारित्र्याचा संशय घ्यायला सुरुवात केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं पत्नीचे खाजगी नग्न फोटो तिच्या ई-मेलवरून स्वत:च्या मेलवर पाठवले. शिवाय संबंधित नग्न फोटो सोशल मीडियावर आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी आरोपीनं पीडितेला दिली. तसेच तिला एकटीला सोडून आरोपी पुणे येथे निघून गेला.
यानंतरही आरोपींचा छळ थांबला नाही. पतीसह सासू सासऱ्यांनी पीडितेकडे 70 लाख रुपये रोख रक्कम आणि सोन्याचं मंगळसूत्र दे, अन्यथा तुझे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली. धक्कादायक बाब म्हणजे सासऱ्याने पीडित विवाहितेचे नग्न फोटो तिच्या आई वडिलांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेनं अखेर नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
0 Comments