google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 साखरपुड्याला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला,4 जणांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात मृत्यू

Breaking News

साखरपुड्याला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला,4 जणांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात मृत्यू

 साखरपुड्याला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला,4 जणांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात मृत्यू

अमरावती : अमरावती  शहरातील रहाटगाव रिंगरोडवर ट्रक व तवेरा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.


तर पाच जण गंभीर जखमी असून सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओव्हरटेकच्या नादात हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक अमरावतीवरून नागपूरच्या दिशेकडे जात होता तर तवेरा कार अमरावतीवरून वलगावकडे जात होती. तवेरा वाहनातील मृतक व जखमी हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील रहिवासी आहेत.


तर तवेरामधील लोक हे वलगाव येथे साक्षगंध सोहळ्याला जात असल्याची माहिती आहे. (12 वर्ष सोबत राहिले; ब्रेकअप होताच प्रियकराने केलेली विचित्र मागणी ऐकून झाली शॉक) अमरावती शहरातील रहाटगाव रिंगरोडवर तवेरा गाडी पोहोचली असता ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात तवेरा कारचा चक्काचूर झाला. कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एका गंभीर जखमीला रुग्णालयात दाखल करत असता मृत्यू झाला.


या अपघातात ५ जण जखमी झाले आहे. जखमींवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार असून रुग्णालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाऊन नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केली. वाहन चालक व मालक रोशन रमेश आखरे, (26 रा.अंजनगाव बारी), प्रतिभा सुरेश पोकळे (वय 50 रा.अंजनगाव बारी ) कृष्णा अतुल घाडगे, (वय 8), गजानन दारोकर (वय 45 राहणार जरुड) अशी मृतांची नावं आहे.  अजून ITR रिफंड मिळाला नाही?


असं चेक करा स्टेटस) तर विजय भाऊराव पोकळे (वय 55 रा. अंजनगाव बारी), ललिता विजय पोकळे (वय 50 अंजनगाव बारी), सुभाष भाऊराव पोकडे (वय 60, रा. अंजनगाव बारी), सुरेश भाऊराव पोकळे (वय 58, रा. अंजनगाव बारी), संगीता गजानन दारोकार (वय 35 राहणार जरुड), रश्मी सचिन गाडगे (वय 30 रा शिरजगाव कसबा) जखमी झाले आहेत.


जखमींना रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे. दरम्यान, मालेगाव-सौंदाणे मार्गावर ट्रक, कार, पिकअपचा तिहेरी विचित्र अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात 1 जण ठार झाला आहे तर 2 जण जखमी झाले. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


या अपघातात पिकअपमधील गायी देखील जखमी झाल्या आहेत. मालेगावच्या सौंदाणे मार्गावर ट्रक, कार आणि पिकअप या तीन वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात घडला. पिकअप मध्ये गायी होत्या अपघातात गायी देखील जखमी झाल्या असून त्यांच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना पांजारपोळ मध्ये ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments