पत्रकार संकेतराज बने हल्ला प्रकरणी दोन संशयितांना अटक.
मिरज /प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी बातमी छापल्याच्या राग मनात धरून पत्रकार संकेतराज बने यांच्यावर
जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी सुरेश राजाराम पोळ (रामनगर, मालगाव) आणि सुनील बिरू गावडे (अहिल्या चौक, मालगाव) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या महिन्यात मिरज-मालगाव रस्त्यावर रात्री बने हे घरी जात असताना ८ ते १० जणांनी त्यांना आडविले. बातमी का लावली, असे म्हणून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर रॉडने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी संकेतराज बने यांच्यावर सांगली सिव्हीलमध्ये उपचार करण्यात आले होते.
त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार
पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
0 Comments