google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : चोरीच्या गुन्ह्यातील किंमती मुद्देमाल फिर्यादीस ३० दिवसाच्या आत परत

Breaking News

सोलापूर : चोरीच्या गुन्ह्यातील किंमती मुद्देमाल फिर्यादीस ३० दिवसाच्या आत परत

 सोलापूर : चोरीच्या गुन्ह्यातील किंमती मुद्देमाल फिर्यादीस ३० दिवसाच्या आत परत


सोलापूर : चोरीच्या गुन्ह्यातील किंमती मुद्देमाल फिर्यादीस ३० दिवसाच्या आत परत मिळाला आहे. चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल आज १२ वाजता पोलीस आयुक्तालयाकडून फिर्यादीस परत देण्याकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.


शहरात  घडलेल्या घरफोडी व चोरीसारख्या गुन्हयातील आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक करुन त्यांचेकडून सदर गुन्ह्यातील किमती मुददेमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर एका महिन्याच्या आतच यातील फिर्यादींना त्यांचे चोरीस गेलेला किंमती मुद्देमाल परत करण्याचा कार्याक्रम सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने घेण्यात येत आहे. गुन्हयातील मुददेमालाचे वाटप फिर्यादींना पोलीस आयुक्त हरीष बैजल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


सदर समारंभाकरीता गुन्हयातील फिर्यादी प्रल्हाद प्रकाश मेंथे, गिरीष विलास जिरपे, श्रीशैल मल्लिकार्जुन कुंभार, धन्यकुमार जिनपाल बिराजदार, गोपाल सदाशिव गजाकोश, हर्षल भारत काळे, चंद्रकांत रामदास देवांग, मल्लिनाथ विरभद्रप्पा माशाळकर, महेश बंडप्पा निला, दादु मुस्तफा शेख, खंडप्पा मलप्पा कोरे, बाबु काशिनाथ राठोड, श्रीपाद मनोहर गाजुल, तनवीर दाऊद खान, सुनंदा प्रकाश बगले, सुहेल अहमद जरगीश मुल्ला, विजय शंकर देशमुख, इरफान अब्दुल गफुरशेख, विशाल ज्ञानदेव कोकणे, अशी फिर्यादींची नावे आहेत.

Post a Comment

0 Comments