google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सावधान! गुगलवर 'या' गोष्टी शोधाल, तर थेट तुरुंगात जाल, वाचा सविस्तर…

Breaking News

सावधान! गुगलवर 'या' गोष्टी शोधाल, तर थेट तुरुंगात जाल, वाचा सविस्तर…

 सावधान! गुगलवर 'या' गोष्टी शोधाल, तर थेट तुरुंगात जाल, वाचा सविस्तर…  



नवी दिल्ली : आज आपण प्रत्येक गोष्टीची माहिती हवी असल्यास सर्वात प्रथम गुगलवर सर्च करत असतो. जगातील सर्वाधिक वापरलं जाणार सर्च इंजिन म्हणून गुगलला ओळखण्यात येतं. परिणामी गुगल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. पण या संसाधनाचा जितका फायदा आहे, तितकाच तोटा देखील आहे. काही गोष्टी गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या गुगलवर कधीच सर्च करू नयेत त्याविषयी जाणून घेऊया.


फिल्म पायरेसी

चित्रपट रिलीज होण्याआधीच ऑनलाइन लीक करणे अथवा डाउनलोड करणे गुन्हा आहे. कायद्यांतर्गत यासाठी 3 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही देखील रिलीज होण्यापूर्वीचा चित्रपट डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत असाल तर वेळीच सावधान व्हा.


बॉम्ब बनविण्याची पद्धत

बऱ्याचदा अनेकजण गुगलवर अनावश्यक गोष्टी सर्च करतात. काही लोकं तर बॉम्ब बनविण्याची पद्धत देखील सर्च करतात. देश आणि सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची असणारी बॉम्ब बनवण्याची पद्धती पाहणं आणि सर्च करण गुन्हा आहे. अशा गोष्टींमुळे अडचणीत सापडू शकता व कारवाई केली जाऊ शकते.


गर्भपात कसा करायचा

गर्भपात करणे हा तर गुन्हा आहेच, पण गर्भपात करण्याच्या पद्धती गुगलवर शोधणं हा सुद्धा मोठा गुन्हा मानला जातो. कायद्यानुसार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भपात करता येत नाही आहे. त्यामुळे गर्भताबाबत गुगलवर सर्च करणं महागात पडू शकतं.


खासगी फोटो आणि व्हिडिओ

सध्या अनेकजण सोशल मीडियाचा वापर करतात. आपले फोटो व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. कधी कधी नकळत अनेक लोकं कुणाचा सूड घेण्यासाठी संबधित व्यक्तीचे खासगी फोटो बनावट अकाऊंटद्वारे शेअर करतात पण लक्षात ठेवा हा कायद्याने गुन्हा आहे. यामुळे जेल देखील होऊ शकते. त्यामुळे चुकूनही असे फोटो-व्हिडिओ शेअर करू नये.


चाइल्ड पोर्न

सरकार चाइल्ड पोर्नोग्राफीच्या विरोधात आहे. गुगलवर चाइल्ड पोर्न सर्च करणे, पाहणे अथवा शेअर करणे गंभीर गुन्हा आहे. असा प्रकार करताना कोणी आढळलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येते. तसेच त्याला जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते.


आजारपणाचे औषध

गुगलवर कोणत्याही आजाराचे औषध सर्च करणे चांगलेच महागात पडू शकते. त्यात तुमचा जीव सुद्धा जावू शकतो. त्यामुळे आजारपणावर उपचार करायचे असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणे हेच फायदेशीर आहे. गुगलवर सर्च करून घरच्या घरी उपचार करणे तुमच्या जीवावर बेतू शकते.

Post a Comment

0 Comments