google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ‘ बाकी सगळेच अर्थहीन ‘ , निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाची केली पोलखोल

Breaking News

‘ बाकी सगळेच अर्थहीन ‘ , निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाची केली पोलखोल

 ‘ बाकी सगळेच अर्थहीन ‘ , निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाची केली पोलखोल



केंद्र सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला असून काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सदर अर्थसंकल्प म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निव्वळ मोठमोठे आकडे फेकून मोदी सरकारने नेहमीच्या पद्धतीने भव्य दिव्य गुलाबी स्वप्ने दाखवली आहेत त्यातून सर्वसामान्यांना काहीही मिळणार नाही अशी टीका केली आहे.


काय म्हणाले बाळासाहेब थोरात ?

मोदी सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी केला असून हा अर्थसंकल्प सर्व वर्गाची घोर निराशा करणारा दिशाहीन आणि अर्थहीन आहे. नफ्यातील सरकारी कंपन्या विकणे आणि इंधनाचे दर वाढवणे यापलिकडे केंद्र सरकारकडे कुठलेही दुसरे धोरण नाही.


सरकारी पैशातून उभ्या केलेल्या व्यवस्था विकायच्या हेच मागील सात वर्षात सुरू आहे आणि भविष्यातही तेच सुरू राहणार आहे असे या अर्थसंकल्पातून शिक्कामोर्तब झालेले आहे. मोदी सरकारने गेल्या सात वर्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पात देखील निव्वळ भविष्याची स्वप्ने दाखवलेली आहेत


मुद्रा लोन, स्टार्टअप योजनांविषयी या विषयी केलेल्या घोषणा, 100 स्मार्ट सिटी, सांसद आदर्श ग्राम योजना या स्थितीवर सरकार काहीच बोलत नाही. गेल्या अर्थसंकल्पातील घोषणांचे काय झाले हे देखील अर्थमंत्र्यांनी काहीच सांगितलेले नाही. कोरोनाच्या संकटात देशातील जनता, छोटे उद्योजक,गावखेड्यातील


 व्यावसायिकांची अत्यंत दयनीय परिस्थिती झालेली आहे त्याबाबत केंद्र सरकारकडे कुठलेच धोरण नाही. कोरोनामध्ये जीव गमवावा लागलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांपर्यंत सरसगट मदतीची अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून होती मात्र त्याबद्दल चकार शब्ददेखील अर्थमंत्र्यांनी काढलेला नाही.


एकीकडे बेरोजगारी आजच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेली आहे तर दुसरीकडे रोजगार निर्मितीचे निव्वळ स्वप्न दाखवले जात आहे. त्या नोकऱ्या टिकवण्यासाठी सकारात्मक धोरणाचा अर्थसंकल्पात पूर्णपणे अभाव आहे. देशातील तरुणांना रोजगार देण्याबाबत कुठलाही रोडमॅप तयार न करता साठ लाख नोकऱ्या देण्याची घोषणा करून बेरोजगार आणि तरुण मतदारांचा डोळ्यात निव्वळ धूळफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे.


शेतकरी, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्ग छोटे व्यापारी बेरोजगार तरूण विद्यार्थी महिला दलित अल्पसंख्याक यांना या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही. निवडक उद्योगपती मित्र सोडता समाजातील सर्व वर्गाची घोर निराशा या अर्थसंकल्पाने केलेली आहे. 


मोदी सरकारने आपल्या स्वभावाप्रमाणे केलेला अर्थसंकल्प हा अर्थ संकल्प असून तो पूर्ण करण्यासाठी ते बांधील नाहीत. मागील सात वर्षात हेच पाहायला मिळाले आहे किंवा आपली वचने पाळण्यासाठी त्यांनी कधी प्रयत्नही केलेला नाही हेच सत्य असून बाकी सगळे अर्थहीन आहे .

Post a Comment

0 Comments