google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! मंगळवेढ्यात ऊसाच्या ट्रॅक्टरने शाळकरी मुलाला चिरडले; चाक पाठीवरून गेल्याने मृत्यू

Breaking News

धक्कादायक! मंगळवेढ्यात ऊसाच्या ट्रॅक्टरने शाळकरी मुलाला चिरडले; चाक पाठीवरून गेल्याने मृत्यू

 धक्कादायक! मंगळवेढ्यात ऊसाच्या ट्रॅक्टरने शाळकरी मुलाला चिरडले; चाक पाठीवरून गेल्याने मृत्यू

मंगळवेढा शहरातील ज्ञानदीप विदयालयातून  घराकडे सायकलवरून परतत असताना नागणेवाडी येथे एका बिगर नंबरच्या ऊस भरलेल्या ट्रॅक्टरने 14 वर्षीय शाळकरी मुलाला जोराची धडक देवून जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान कृष्णा सनतकुमार थिटे  असे मयत मुलाचे नाव आहे.

या घटनेची हकिकत अशी, यातील मयत मुलगा कृष्णा थिटे (रा.फुगारे गल्ली) हा कारखाना रोडवरील ज्ञानदीप स्कूलमध्ये इयत्ता 8 वी च्या वर्गात शिकत होता.


दि.23 रोजी सकाळी 8.00 वा. घरातून तो शाळेला गेला होता. दुपारी 1.30 वा.शाळेतून परत घरी रेंजर सायकलवरून येत असताना नागणेवाडी येथील श्रीजल पाणी फिल्टरच्या समोर ऊसाने भरलेल्या लाल रंगाच्या बिगर नंबरच्या महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी होवून मयत झाला. फिर्यादी यास एकच मुलगा असल्याने काळाने त्याच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याची फिर्याद वडील सनतकुमार थिटे यांनी दिल्यावर अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवेढा शहरामध्ये अवजड वाहने सातत्याने येत असल्यामुळे वारंवार पोलिस प्रशासनाकडे तक्रारी करूनही वाहतूक शाखेचे पोलिस याकडे कानाडोळा करीत असल्याने शहरात रात्रंदिवस ही वाहने जात आहेत.


सध्या शाळा चालू असल्याने दामाजी चौकात विदयार्थ्याची गर्दी व प्रवाशांची वर्दळ असते. शहराच्या बाहेरून अवजड वाहनांना जाण्यासाठी कोटयावधी रूपये खर्चून शहरालगत रस्ते तयार करूनही याचा वापर न होता शहरामध्येच ही वाहने येत आहेत नव्याने कार्यभार स्विकारलेले पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी यापुढे तरी शहरात वाहने येणार नाहीत याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments