google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हसापुरे दूध संघांच्या बैठकांना, काँग्रेसवाल्या अनेकांच्या पोटात 'दुखले', थेट तक्रार 'सहप्रभारीं'कडे, जिल्हाध्यक्ष धवलसिंहांनी काढला हा फतवा

Breaking News

हसापुरे दूध संघांच्या बैठकांना, काँग्रेसवाल्या अनेकांच्या पोटात 'दुखले', थेट तक्रार 'सहप्रभारीं'कडे, जिल्हाध्यक्ष धवलसिंहांनी काढला हा फतवा

 हसापुरे दूध संघांच्या बैठकांना, काँग्रेसवाल्या अनेकांच्या पोटात 'दुखले', थेट तक्रार 'सहप्रभारीं'कडे, जिल्हाध्यक्ष धवलसिंहांनी काढला हा फतवा

सोलापूर : जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व  वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे हे दोन नेते सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उपस्थित होते. अशा बैठका सुरेश हसापुरे यांना डावलून सहसा होत नाहीत.


दूध संघाच्या बैठकीत हसापुरे यांची उपस्थिती जिल्हा काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना बघवली गेली नाही. त्यांच्यात चुळबूळ सुरू झाली, आता हसापुरे यांना कशा पद्धतीने लक्ष करायचे याचे नियोजन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या केबिनमध्ये झाले.


याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल या सोलापूर दौऱ्यावर होत्या. डिजिटल सभासद नोंदणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. काँग्रेस भवनात महिला पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर झाल्यानंतर त्या हॉटेल बालाजी सरोवर येथे थांबल्या होत्या. दरम्यान जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील  यांना त्यांनी होटेल सरोवरला बोलावले.


त्यांच्यासोबत माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, वरिष्ठ उपाध्यक्ष भीमाशंकर जमादार, सुधीर लांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, राधाकृष्ण पाटील, भीमराव बाळगे यांच्यासह इतर काही पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी सोनम पटेल यांनी ग्रामीण भागात डिजिटल नोंदणीवर भर देण्याच्या सूचना केल्या दरम्यान इतर चर्चा करताना काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हा दूध संघाच्या बैठकीला इतर कोणत्याच पदाधिकाऱ्यांनाबोलावले जात नाही.


केवळ सुरेश हसापुरे आणि सिद्धाराम म्हेत्रे हे दोनच नेतेमंडळी कशी काय? उपस्थित राहतात अशी नाराजी व्यक्त करत हा पक्षशिस्तीचा भंग नाही का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर स्थानिक राजकारण माहित नसलेल्या सोनम पटेल यांनी यापुढे जिल्हाध्यक्षांच्या परवानगीशिवाय सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या कोणत्याही  बैठकांना पदाधिकाऱ्यांनी जायचे नाही अशा सूचना दिल्या. त्यावर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी नवा फतवा काढला असून त्यामध्ये त्यांनी काय म्हटलयं पहा....


सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना  पश्चिम महाराष्ट्राच्या सहप्रभारी  श्रीमती सोनल पटेल यांच्या आदेशावरून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, तालुका /ब्लॉक अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी, फ्रंटल सेल विभागाचे अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी, 


जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत नगरपरिषदेचे नगरसेवक यांना महत्वाची सूचना सहकार क्षेत्रातील  कोणत्याही निवडणुकीत भाग घेताना, निवडणूक लढविताना किंवा निवडणूक संदर्भातील बैठकीत भाग घेत असताना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची परवानगी घेणे अनिवार्य आहे. अन्यथा  अशा पदाधिकार्‍यांवर  पक्षशिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.


आपला

डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील

अध्यक्ष, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी


Post a Comment

0 Comments