google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धाबे दणानले! मंगळवेढयात अवैद्य दारू विक्री दोन ठिकाणी छापे; पोलीस निरीक्षक रणजीत माने "ॲक्शन मोड"मध्ये

Breaking News

धाबे दणानले! मंगळवेढयात अवैद्य दारू विक्री दोन ठिकाणी छापे; पोलीस निरीक्षक रणजीत माने "ॲक्शन मोड"मध्ये

 धाबे दणानले! मंगळवेढयात अवैद्य दारू विक्री दोन ठिकाणी छापे; पोलीस निरीक्षक रणजीत माने "ॲक्शन मोड"मध्ये



मंगळवेढा तालुक्यात सुरु असलेल्या अवैद्य दारू विक्री व्यवसायाविरूध्द मंगळवेढा पोलिसांनी कारवाईची मोहिम सुरु केली असून पोलिसांनी हुलजंती व लक्ष्मी दहिवडी येथे छापे टाकून जवळपास 8 हजाराची दारू जप्त करून राजेंद्र रामचंद्र सोनवले(वय 63 रा.लक्ष्मी दहिवडी) व सोमनाथ चेळेकर (रा.मंगळवेढा) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.


पोलिससुत्रांनी दिलेली माहिती अशी,नव्याने कार्यभार घेतलेले पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी शहरासह ग्रामीण भागात सुरु असलेल्या अवैद्य दारू विक्रीविरूध्द मोहिम उघडली असून या मोहिमेत लक्ष्मी दहिवडी येथे सायंकाळी 6.10 वा.आरोपी राजेंद्र सोनवले याचे राहते घराच्या पाठीमागे


तो अवैद्य दारू विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी 5 हजार 640 रूपये किमतीच्या देशी संत्रा कंपनीच्या 94 सीलबंद बाटल्या मिळून आल्या.याची फिर्याद पोलिस हवालदार प्रमोद मोरे यांनी दिली.


तर दुसर्‍या घटनेत हुलजंती येथील हॉटेल शिवमच्या बाजूला एक इसम बेकायदा दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे, पोलिस हवालदार सुनिल गायकवाड यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता दारू


विक्रेता पोलिसांना पाहून मुद्देमाल टाकून पळून गेला. ही घटना सायंकाळी 7.10 वा.घडली.पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सोमनाथ चेळेकर (रा.मंगळवेढा) असे दारू विक्रेत्याचे नाव चौकशीत निष्पन्न झाले. येथे 2040 रुपये किमतीच्या देशी विदेशी कंपनीच्या 25 दारूच्या बाटल्या मिळून आल्या.


मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात अवैद्य दारू विक्री व्यवसायावरील कारवाईची मोहिम अधिक तीव्र केली जाणार असून यात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments