Budget 2022: ‘६० लाख नवे रोजगार निर्माण करणार’
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आर्थिक वर्ष २०२२- २३ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करायला सुरुवात केली आहे. लोकसभेत हा अर्थसंकल्प सादर केला जात असून त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जगभरात सुरु असलेल्या कोरोना महामारीचा उल्लेख केला. या महामारीच्या काळातही भारत आपला विकास असाच सुरू ठेवेल अशी अपेक्षा आहे, असे म्हटले आहे.
देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत ६० लाख नवे रोजगार निर्माण करणार असल्याचे सीतारमण म्हणाल्या.
सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असं त्यांनी म्हटले. बँकाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहोत अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. या बजेटमध्ये पुढच्या २५ वर्षांची ब्ल्यू प्रिंट असणार आहे, असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे.

0 Comments