पेट्रोलच्या गाडीत इलेक्ट्रिक किट बसवायचे आहे ?
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे . तुम्ही तुमच्या मोटारसायकल आणि स्कूटरमध्ये इलेक्ट्रिक किट रिट्रोफिट करून घेता येणार आहे .
त्यामुळे पेट्रोलचा खर्च निम्म्याने होण्याची शक्यता आहे . हे किट बसविण्याचा खर्चही जास्त नाही . दुचाकी वाहनांमध्ये तुमच्याकडे हिरो स्प्लेंडरसारखी दुचाकी आणि होंडा अॅक्टिव्हासारखी स्कूटर असेल तर या वाहनांना इलेक्ट्रिक दुचाकीत रूपांतरित करू शकणार आहात .यासाठी सध्या देशाच्या विविध भागात स्टार्टअप्स आहेत .
या स्टार्टअपच्या माध्यमातून दुचाकीमध्ये इलेक्ट्रिक किट रिट्रोफिटिंग करण्याचे काम करतात . यामध्ये Zuink , GoGoAl आणि Bounce सारख्या कंपन्यांची नावे प्रसिद्ध आहेत . या कंपन्या मोटारसायकलचे इंजिन आणि गिअरबॉक्स बदलतात आणि वाहनात इलेक्ट्रिक मोटार बसवतात .
मोटार वाहन कायद्याच्या कलम 52 नुसार वाहनांमध्ये नोंदणी व्यतिरिक्त कोणतेही रेट्रोफिटिंग बदल करायचे असल्यास आरटीओ मान्यताप्राप्त इलेक्ट्रिक किट घेणे योग्य राहील . पेट्रोल स्कूटरला इलेक्ट्रिक बनवण्यासाठी मोटारसायकलपेक्षा कमी खर्च येतो . याचे कारण म्हणजे स्कूटरला चांगली बूट स्पेस आहे .• त्यामुळे किट बसविण्याची किंमत कर्मी होते .
आरटीओने मंजूर केलेल्या रेट्रोफिट इलेक्ट्रिक मोटारची किंमत 15 ते 20 हजार पर्यंत असते . परंतु श्रेणी आणि ऊर्जेच्या हिशेबानुसार बॅटरीची किंमत वेगळी द्यावी लागेल . ही एक वेळचीच किंमत असून , एक बॅटरी तीन वर्षांच्या वॉरंटीसह मिळते . काही कंपन्या स्वॅप करण्यायोग्य बॅटरी भाड्याने देतात .
Zuink किट स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह मिळते . ही कंपनी बंगळुरुमध्ये सेवा देते . त्यांचे किट 27 हजार रुपयांना मिळते . 899 रुपये प्रति महिना हप्त्यावरही ती घेतली जाऊ शकते . GOGOAl या बॅटरीची किंमत 35 हजार रुपये आहे . यामध्ये बॅटरीची किंमत आणि जीएसटी वेगळा द्यावा लागणार आहे . हे किट लावल्यानंतर एका चार्जनंतर दुचाकी 151 किमीपर्यंत धावू शकते .

0 Comments