राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने १ फेब्रुवारीपासून नवीन सुधारीत नियमावली जाहीर केली आहे.
या नियमावलीअंतर्गत मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अटी व थर्ती शिथिल करण्याचा निर्णय़ विभागाने घेतला आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार ज्या जिल्ह्यामध्ये ९० टक्के नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे, तसेच ७० टक्के लोकांचे दोन्ही लसीचे डोस पूर्ण झाले आहेत, अशा जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुंबई, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, कोल्हापूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये दोन्ही डोसचे लसीकरण हे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निकषानुसार झाले आहे. १ फेब्रुवारीपासूनच हे नवीन नियम संपूर्ण राज्यात लागू होतील.
कोणत्या गोष्टींचे निर्बंध शिथील ?
1 सर्व राष्ट्रीय प्राणी संग्रहालये आणि सफारी खुले करण्य़ासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये लसीकरण असलेल्या व्यक्तींनाच ही परवानगी देण्यात आली आहे.
२. सर्व पर्यटन स्थळे ही नियमित वेळेनुसार ऑनलाईन बुकिंगनेच खुली करण्यात आली आहे. याठिकाणी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे अपेक्षित आहे.
३. स्पा साठी ५० टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे
४. अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्यांसाठी कोणतीही लोकांची मर्यादा आता नसेल.
याआधीच्या ८ जानेवारीच्या आदेशान्वये ज्या जिल्ह्यांना पहिल्या डोसचे लसीकरण ९० टक्के तर दुसऱ्या डोसचे लसीकरण ७० टक्के झाले आहे, अशा जिल्ह्यांना काही अटी आणि शर्थींमध्ये शिथिलता याआधीच देण्यात आली आहे.
१ समुद्र किनारे, उद्याने, पार्क हे स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केल्यानुसार खुले राहतील
२ अम्युझमेंट आणि थीम पार्क हे ५० टक्के क्षमतेने खुली राहतील
३ रेस्टॉरंट, थिएटर्स, नाट्यगृहे ही ५० टक्के क्षमतेने खुली राहतील
४ स्विमिंग पूल, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने खुली राहतील
५ भजन तसेच इतक सांस्कृतिक कार्यक्रमांना ५० टक्के क्षमतेने परवानगी राहील
६ लग्नसमारंभासाठी बंदिस्त हॉलमध्ये २०० व्यक्तींना तर खुल्या मैदानात २५ टक्के लोकांना उपस्थितीसाठी परवानगी असेल
७ स्थानिक प्राधिकरणाला रात्रीच्या ११ ते ५ दरम्यान संचारबंदीचे अधिकार असतील
८ खेळांसाठी २५ टक्के इतक्या क्षमतेनेच प्रेक्षक उपस्थित राहू शकतील
९ स्थानिक प्राधिकरणालाच ठराविक मर्यादेसह पर्यटन स्थळे खुली करता येतील
१० स्थानिक प्राधिकरणच आठवडी बाजारांसाठी परवानगी देईल

0 Comments