google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार ; आरोपीला अटक

Breaking News

धक्कादायक ! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार ; आरोपीला अटक

 धक्कादायक ! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार ; आरोपीला अटक


एका 28 वर्षीय विवाहित महिलेला मोटर सायकलवर पळवून नेवून कर्नाटक हद्दीतीतील एका बंद शाळेत रात्रीच्यावेळी त्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने तीच्याशी शरीर संबंध केल्याप्रकरणी किसन आगतराव शिंदे (रा.पडोळकरवाडी) 


याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी ही दि.30 रोजी सायंकाळी 7.45 च्या दरम्यान पडोळकरवाडी येथील हुलगे यांच्या शेतातील ऊसाच्या शेतातून काम करून फिर्यादी व तीची तीन वर्षाची मुलगी वडीलांच्या घराकडे जात असताना


यातील आरोपी किसन शिंदे याने मोटर सायकलवर येवून फिर्यादीस तुला तुझ्या वडीलांच्या घराजवळ सोडतो अशी बतावणी करून मुलीस व फिर्यादीस शीटवर बसवून मोटर सायकल जोराची चालवीत इरकरवाडीकडे घेवून जावू लागला.


यावेळी फिर्यादीने तु मला इकडे कोठे घेवून जात आहे असे विचारले असता आरोपी काही न बोलता तसाच जोरात गाडी घेवून गेला.


दि.31 रोजी मध्यरात्री 1.00 च्या दरम्यान विजापूर गावच्या अलिकडे एका गावातील बंद शाळेत पिडीत महिलेस व तीच्या मुलीस ठेवले.


त्यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केला परंतू कोणीही आवाज न ऐकल्याने मदतीला आले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.फिर्यादी ही त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत होती.


आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत पिडीतेशी शारिरिक संबंध बळजबरीने केले. त्यानंतर पहाटे 5.00 च्या दरम्यान नागूरगावच्या बाहेर असलेल्या एका दुर्गा मंदिराजवळ पिडीतेस व मुलीस आरोपीने नेले.


तेथेही जबरदस्तीने शारिरिक संबंध केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.


या दरम्यान आरोपी पिडीतेपासून दूर गेल्यानंतर रस्त्याने जाणार्‍या एका इसमाकडून मोबाईल घेवून तीने वडिलांच्या घरी कॉल केला.


व सदर माहिती सांगितल्यावर पिडीतेच्या नातेवाईकांनी घटनास्थळी येवून आरोपीस पकडून ठेवून त्यास मंगळवेढा पोलिसांच्या हवाली करण्यात आले.या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसो पिंगळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments