google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अज्ञात कारणावरून एका इसमाने अचकदाणी येथील फॉरेस्टमधिल झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या !

Breaking News

अज्ञात कारणावरून एका इसमाने अचकदाणी येथील फॉरेस्टमधिल झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या !

 अज्ञात कारणावरून एका इसमाने अचकदाणी येथील फॉरेस्टमधिल झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या !



सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : अज्ञात कारणावरून एका इसमाने अचकदाणी येथील फॉरेस्टमध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . 


भिमराव विठोबा शेळके वय अंदाजे ४६ वर्षे रा शिवणे ता . सांगोला असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे . अचकदाणी ता . सांगोला येथील वनविभागाच्या  फॉरेस्टमध्ये शामराव धोंडीबा खरात हे वनमजूर म्हणून कामास आहेत . ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे शामराव खरात हे फॉरेस्टमध्ये गेले होते . 


फॉरेस्टमध्ये जनावरे फिरतात ,लाकुडतोडी होते , वाहने फिरतात म्हणुन गस्त घालत असताना वनमजूर शामराव खरात यांना अचकदानी ते वाकी रस्त्याच्या रस्त्याचे कडेला एक सिल्वर रंगाची कार लावलेली दिसली . 


फॉरेस्टमध्ये कार कोणी लावली आहे पाहण्यासाठी कारजवळ गेले असता कारमध्ये कोणीही दिसले नाही . कारच्या काचा उघड्या होत्या . त्यांनी आजुबाजुला कोणी आहे का पाहण्यासाठी थोडे चालत पुढे गेले असता त्यांना एका अनोळखी व्यक्तीने झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले .


 त्यानंतर त्यांनी फॉरेस्ट ऑफिस व शिवणे गावचे पोलीस पोटील यांना फोन करुन फॉरेस्टमध्ये अनोळखी पुरुषाने गळफास घेतल्याचे सांगितले .  घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्याचे सपोनि नागेश यमगर , पोलीस कर्मचारी , पोलीस पाटील , घटनास्थळी दाखल झाले . 


त्यावेळी त्यांनी मयत व्यक्तीच्या खिशातील मोबाईल व कागदपत्राची पाहणी केली असता मयत व्यक्तीचे नाव भिमराव विठोबा शेळके वय अंदाजे ४६ वर्षे रा शिवणे ता सांगोला असे असल्याचे समजले . याप्रकरणी वनमजूर शामराव धोंडीबा खरात यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

Post a Comment

0 Comments