लक्ष्मीनगर येथे आम शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते होणार विविध विकासकामांचा उदघाटन समारंभ.
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार ऍड शहाजी बापू पाटील यांच्या आमदार फ़ंडातुन मिळालेल्या विकास कामाचा,पंचायत समिती स्तर,जिल्हा परिषदेतुन मिळालेल्या आणि ग्राम विकास आराखड्यातील कामाचा शुभारंभ उद्या रविवार दि 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता लक्ष्मीनगर येथे होणार असल्याची माहिती सरपंच धनाजी बाड आणि उपसरपंच स्वाती साठे यांनी दिली आहे.
सदर कार्यक्रमास शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर,माजी नगराध्यक्ष रफीक नदाफ,जि प सदस्य गोविंद जरे, युवा नेते दिग्विजय पाटील,युवा नेते सागर पाटील,प्रा संजय देशमुख,शिवसेना तालुका अध्यक्ष सूर्यकांत घाडगे,,पंचायत समिती सदस्या रुपाली लवटे,वंदना गायकवाड,पंचायत समिती सदस्य संजय मेटकरी,सुभाष इंगोले,युवा नेते दादासाहेब लवटे, युवा नेते गुंडा दादा खटकाळे,पंचायत समिती गटविकास अधिकारी आनंद लोकरे,बांधकाम विभागाचे उपअभियंता जे व्ही मुळीक, पाणी पुरवठा विभागाचे सुरेश कमले,खवासपूरचे सरपंच लक्ष्मण भोसले, चिकमहुद गावचे सरपंच रवींद्र कदम उपसरपंच सुरेश कदम,आचकदाणी गावचे सरपंच विजय पाटील आदि मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी केले आहे.

0 Comments