श्रीमती अनुजा निचत ह्यांना २०२२ चा नॅशनल वूमेन्स एक्सचेलेन्स अवॉर्ड जाहीर, ९ मार्चला दिल्लीत होणार सत्कार
कोरोनाच्या काळात रोजंदारी वर काम करणाऱ्या गोर गरीब लोकांना आर्थिक मदत तसेच मोफत अन्न धान्य वितरित केले. श्रीमती अनुजा निचत ह्या एक समाजसेविका असून त्या त्यांचा नवऱ्याचा खांद्याला खांदा लावून त्यांची अहोरात्र मदद करत असते. ते होप फाऊंडेशन मार्फत त्यांचे समाजीक कार्य करीत आहेत.
त्यांच्या सामाजिक कार्यासाठी महिला दिनानिमित्त २०२२ चा नॅशनल वूमेन्स एक्ससिल्लेन्स अवॉर्ड जाहीर झाला आहे. हा सोहळा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सकपाळ ह्यांना श्रद्धांजली अर्पण करण्या हेतू घेण्यात येणार आहे. डॉक्टर विशाखा सोसिअल वेल्फेर फौंडेशन,
आदिलेला फौंडेशन, दीप वेलफेरे सोसायटी, भगवान वाल्मिकी फौंडेशन, MSY मेमोरियल फौंडेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा ९ मार्च २०२२ रोजी कॉन्फरेन्स हॉल जुने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे उपस्तिथ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमाला उघटक म्हणून मा. श्री अमोलक्रतन कोहली, माजी राज्यपाल (मिझोराम) प्रमुख पाहुणे म्हणून मा. रामदास आठवले जी लाभलेले. तसेच विशेष अतिथी म्हणून सन्मानीय श्री प्रियांक कानुंगो (चेअरमन एन सी सी आर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया),
डॉ. ज्ञानेश्वर मुले (मेंबर हुमान राईट्स कमिशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया) श्री झाकीर खान (चेअरमन डी एम सी गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली) इत्यादी मान्यवर उपस्तिथ राहणार आहे. डॉ मनीष गवई, डॉ. आदिनारायण, श्री अजय प्रकाश, इत्यादी आयोजकांनी हि माहिती निमंत्रणाद्वारे दिली. श्रीमती अनुजा निचत ह्यांची कामगिरी पाहता त्यांच्या ईस्ट मंडळी कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या मित्र परिवार कडून त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीचा हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.

0 Comments