google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अवैध वसुली! बेकायदेशीर सावकारकीची वसुली करणाऱ्या दोघांना अटक

Breaking News

अवैध वसुली! बेकायदेशीर सावकारकीची वसुली करणाऱ्या दोघांना अटक

 अवैध वसुली! बेकायदेशीर सावकारकीची वसुली करणाऱ्या दोघांना अटक 

कोणताही सावकारी करण्याचा परवाना नसताना बार्शी शहरातील बेकायदेशीर सावकारी करीत असल्याप्रकरणी पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यातील वसुली करणारे संशयित पिंटू ऊर्फ यशवंत सुभाष गुंड ( ४० , नाईकवाडी प्लॉट , बार्शी ) व सुरेश बाळासाहेब जाधव ( २७ , रा . मांगडे चाळ , बार्शी ) अटक करण्यात आली. बार्शी न्यायालयात न्या.आर. एस. धडके यांच्यासमोर उभा करताच सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ही घटना २० डिसेंबर २१ रोजी होऊन याबाबत सहायक निबंधक सुभाष महाडिक, बार्शी यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.


त्यानुसार सावकार रंजेश बबनराव मुसळेसह (रा.नाईकवाडी प्लॉट ) तिघांविरुद्ध बार्शी शहर पोलिसांत सावकारी अधिनियमानुसार गुन्हा नोंदला होता. याबाबत अनिल मुरलीधर खाडे (रा .दत्तनगर, बार्शी ) यांनी त्याच्याविरुद्ध १० डिसेंबर रोजी तक्रार अर्ज दिलेला होता. त्याची चौकशी करताना सावकारी नोंदणी परवाना नसताना सावकार बेकायदेशीररीत्या वसुली केल्याचे दिसून आले.



त्यामुळे अनिल खाडे यांनी तक्रारी अर्जानुसार फिर्यादी सहा.निबंधक महाडिक यांनी त्याची शहानिशा करण्यासाठी रंजेश मुसळे यांच्या बार्शीतील उपळाई रोडवरील रहाते घरी व भगवंत मंदिराजवळील दुकानात २० डिसेंबरला धाड टाकली होती. त्यात संशयित कागदपत्रे जप्त केली होती . त्यानुसार यातील वसुली करणाऱ्यांची चौकशी करताना या दोघांची माहिती मिळाली . त्यांना बुधवारी ( दि . २३ ) रोजी अटक केली. गुरुवारी न्यायालयासमोर उभे करताच दोघांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली. पुढील तपास फौजदार स्वप्निल इज्जपवार करत आहेत.

Post a Comment

0 Comments