सांगोला ग्रंथालय संघाचे वतीने राज्याध्यक्ष गजानन कोटेवार यांचा सत्कार सोहळा संपन्न 

सांगोला (अमर कुलकर्णी ):- महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे नवनियुक्त अध्यक्ष ग्रंथमित्र डॉक्टर गजानन कोटेवार यांची अध्यक्षपदी निवड झालेनंतर प्रथमता सोलापूर जिल्हा दौऱ्यावर सांगोला येथे आले असता सांगोला तालुका ग्रंथालय संघ ,सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या वतीने सत्कार सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे विद्यमान अध्यक्ष, तालुका संघाचे संस्थापक अध्यक्ष ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मानाचा फेटा ,मायेची शाल , मानपत्र ,विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा, गोंदवलेकर महाराज ग्रंथ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र सोनलकर, तालुका संघाचे माजी अध्यक्ष रामदास भोसले, विठ्ठल वलेकर, विद्यमान अध्यक्ष अशोकराव गंगाधरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.


सत्कार सोहळ्यात बोलताना डॉक्टर कोटेवार यांनी आपण केलेला सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. मी आपला सदैव ऋणाईत असेन मिळालेल्या पदावर काम करताना चळवळीतील अडीअडचणी असणारे प्रश्न आपल्या सर्वांच्या सहकार्याने सोडविण्यास मी कटिबद्ध आहे. गुलाबराव पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना कोटेवार सराचे ग्रंथालय चळवळीतील योगदान काम करण्याची कसब’ प्रश्न मार्गी लावण्याची ताकद आणि त्यांचेसी असलेले मैत्रीपूर्ण ऋणानुबंध याविषयी मौलिक विचार व्यक्त करून त्यांचे नेतृत्वात ग्रंथालय चळवळीतील असणारे अनेक प्रश्न निश्चितपणे मार्गी लागणार आहेत.


यावेळी अध्यक्षीय मनोगत डॉ. मच्छिंद्र सोनलकर, माजी अध्यक्ष रामदास भोसले ,डॉक्टर संजीव कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अशोकराव गंगाधरे, सूत्रसंचालन सचिव अशोक व्हटे, आभार मा.सचिव सोमनाथ ढोले व सत्कारमूर्ती यांच्या मानपत्राचे वाचन व लेखन सन्मित्र वाचनालयाचे उपाध्यक्ष बापुसो भंडगे यांनी केले.


यावेळी रमेश मोरे (बावी माढा))तालुका संघाचे सहसचिव संजय सरगर ,कोषाध्यक्ष संजय पवार, संचालक उध्दव पवार ,दत्तात्रेय काशीद ,त्रिंबक गायकवाड ,सुरेश गंभीरे ,लक्ष्मण दिघे ,संपादक औदुंबर काळे ,बिरुदेव काळे, विजयकुमार जगताप ,दत्तात्रय पाटील, तसेच चळवळीवर अखंडित प्रेम असणारे असणारे अशोक सावंत, अशोक जगताप, राजाभाऊ इंगोले, रणजीत भगत ,शरद कोळवले ,सुनीलदत्त कोरे , सतीश इंगवले , रणजित मोहिते, विजयकांत खटकाळे, दत्तात्रय पवार, डॉ. सूर्यकांत कोळेकर आशुतोष भंडारे, भीमराव सांगोलकर , श्रीमंत वाघमारे ,महादेव कदम ,एकनाथ पाटील, पांडुरंग कोकरे ,साधू गोडसे, आकाश आळतेकर , कांतीलाल लवटे ,अमर कुलकर्णी आदी ग्रंथालयाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होणे कामी तालुका ग्रंथालय संघाचे पदाधिकारी,संचालक मंडळ कर्मचारी संघ,पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.