ब्रेकींग : सोलापूरच्या पोलिसांना पुण्याहून धमकी गडचिरोलीला बदली करू का? बजरंगदलाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा
सोलापूर : सोलापुरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन करण्यात आले यावेळी कर्नाटक येथील एका घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता दरम्यान याप्रकरणी पुण्यातील एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरातील पोलिसांना फोनवरून आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल का केला आता गडचिरोलीला जायची तयारी ठेवा अशा शब्दात त्याने फोनवरून धमकावले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवारी 23 फेब्रुवारी रोजी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे मोठे आंदोलन झाले. कर्नाटक येथील शिवमोगा जिल्ह्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली होती. त्याविरुद्ध सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन केले आणि कर्नाटक येथील घटनेचा निषेध केला. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले होते.
सदर बजार पोलिसांनी आंदोलनानंतर सर्व आंदोलकांना ताब्यात घेउन गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचा आंदोलनाच्या ठिकाणी अनेकांनी विरोध केला होता. पण त्यांनतर पुणे येथील विकी कुलकर्णी याने सदर बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या बाळू सूर्यकांत जाधव याला मोबाईलवर धमकी दिली आहे. पोलीस नाईक बाळू जाधव याने याबाबत रीतसर फिर्याद दिली.
दरम्यान विकी कुलकर्णी याने बाळू जाधव या पोलीस नाईकला फोन वरून धमकी दिली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याना अटक का केली असा जाब विचारत तुमच्या अधिकाऱ्यांना गडचिरोली जायची तयारी ठेवा असे सांगितले. याबाबत सदर बजार पोलीस ठाण्यात भा.द.वि.186 आणि 507 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक तपास पोलीस नाईक देंडे करत आहेत.

0 Comments