लहान मुलांमध्ये आढळला ओमायक्रॉनचा नवीन व्हेरिएंट
पुण्यातील एनआयव्ही इनस्टट्यूटमध्ये जिनोमिक सिक्वेंसिग केलेल्या लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट बी ए 2 आढळून आला आहे. जिनोमिक सिक्वेंसिगसाठी एनआयव्हीला 6 वर्षाच्या आतील चार मुलांचे अहवाल पाठवले होते.
चार मुलांचे अहवाल पुण्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. निलेश गुजर यांनी पाठवले होते. दोन मुलांमध्ये ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. ओमिक्रॉनचा व्हेरिएंट बदलायला सुरुवात झाली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशातील कोरोनाचा प्रकोप अद्यापही कायम आहे. त्याचबरोबर तिसर्या लाटेत लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याचा काळात माझ्या क्लीनिक काही पॉझिटिव्ह पेशंट आढळले, त्यानंतर मी एनआयव्हीच्या पोतदार मॅडमला विनंती केली
की आपण याचे जिनोमिंग सिक्वेन्स करूया का? त्यांनीही यासाठी तात्काळ परवानगी दिली. ज्या चार रुग्णांचे जिनोमिग सिक्वेन्स केल्यानंतर त्यामध्ये असे आढळून आले कि त्या चारही जणांच्यामध्ये ओमिक्रॉनचा बी ए 2 नावाचा व्हेरिएंट आढळून आला.
युरोपमध्ये ओमिक्रॉनचा बी ए 1 हा सब 1 व्हेरिएंट हा सद्यस्थितीला धुमाकूळ घालत आहे. आपल्याकडे बी ए 2 चे रुग्ण आढळून आले आहेत. यावर अद्यापही संशोधन सुरु आहे. नवीन व्हेरिएंट किती धोकादायक आहे, याचे संशोधन होणे बाकी आहे.
पण बी ए 1 व बी ए 2 मधील अनेक गोष्टीमध्ये साम्य आढळून आले आहे. या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यानंतर घश्यात दुखते, डोके दुखणे, त्यानंतर लहान मुलांना हातपाय दुखणे अशी लक्षणे आढळून येत असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. निलेश गुजर यांनी दिली आहे.
मागील आठवड्यात जिल्ह्यात 90 हजार 13% नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील 109 टक्के लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर 85 टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.
60 वर्षावरील सहव्याधी असलेल्या 23 टक्के नागरिकांनी लसीचा बुस्टर डोस घेतला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाई करून 75 लाख 92 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहितीही दिली.

0 Comments