google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 व्वा,पोलीस आयुक्त साहेब मानले राव तुम्हाला, ही अपेक्षा सोलापूरकरांना किती वर्षांपासून होती

Breaking News

व्वा,पोलीस आयुक्त साहेब मानले राव तुम्हाला, ही अपेक्षा सोलापूरकरांना किती वर्षांपासून होती

 व्वा,पोलीस आयुक्त साहेब मानले राव तुम्हाला, ही अपेक्षा सोलापूरकरांना किती वर्षांपासून होती



सोलापूर : शिस्तप्रिय असणारे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी दणका देत शहर वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपाई यांची तडकाफडकी बदली  केली आहे.


परराज्यातील वाहनाना विनाकारण अडविल्या प्रकरणी पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक शहर वाहतूक शाखा (दक्षिण) नितिन शिवाजी पवार यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियंत्रण कक्षात टाकण्यात आले आहे,


तसेच शहर वाहतूक शाखा (दक्षिण) पोलिस शिपाई शशिकांत गोविंद देडे यांची बदली सदर बझार पोलिस ठाणे येथे केली आहे. विनाकारण परराज्यातील वाहनांना अडविल्या प्रकरणी उचलबांगडी करण्यात आले असून सोलापूर शहर वाहतूक शाखेत एकच खडबळ उडाली आहे. 


सोलापूर शहरात प्रवेश करताना पुणे नाका, अक्कलकोट नाका, हैदराबाद नाका, विजापूर नाका, भैय्या चौक, तुळजापूर नाका हे चौक लागतात. 


शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून या चौकात MH 13 नंबरची वाहने सोडून इतर कोणतेही वाहन दिसले की त्यांना अडवलेच समजा. पैसे उकळण्यासाठी त्या वाहनधारकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो, ही कागदपत्रे नाहीत, हे दाखव ते दाखव म्हणून. अनेक प्रवाशांनी यापूर्वी तक्रारी केल्या आहेत.


पत्रकारांनी सुद्धा यापूर्वी च्या पोलीस आयुक्तांना वेळोवेळी सांगितले होते मात्र कोणतीही सुधारणा झाली नव्हती. परंतु वाहतूक शिस्तप्रिय पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या या कारवाईने अशा अडवणूक करणाऱ्या ट्राफिक पोलिसांना निश्चितच शहाणपण येईल हे नक्की आहे. नाकाबंदी गरजेची असते,


 संशयित वाहने अडवली पाहिजे,ती तपासणी झाली पाहिजे परन्तु प्रवाशांना अडवून त्यांना त्रास दिल्याने सोलापूरची बदनामी वाहतूक पोलिसांमुळे होत आहे हे थांबले पाहिजे.  ग्रामीण भागात सुद्धा वाहन धारकांना अनेक ठिकाणी अडवणूक करून नाहक त्रास दिला जातो म्हणून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडून ही अशा प्रकारावर लक्ष राहावे ही अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments