google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “नेत्यांची मुलं दारु पितात, माझ्याकडे पुरावे” : बंडातात्या कराडकर यांचा बॉम्ब

Breaking News

“नेत्यांची मुलं दारु पितात, माझ्याकडे पुरावे” : बंडातात्या कराडकर यांचा बॉम्ब

 “नेत्यांची मुलं दारु पितात, माझ्याकडे पुरावे” : बंडातात्या कराडकर यांचा बॉम्ब


कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा. राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात. विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचं आंदोलन करता आलं नसतं. पण मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारुविक्रीचा हा अत्याचार लादला आहे.


राज्यातील अनेक नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात. याचे पुरावेदेखील माझ्याकडे आहेत, असे सांगत ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारने सुपर मार्केट तसंच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाला विरोध केला आहे.


पत्रकारांशी बोलताना ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर म्हणाले की, कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा. राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात.


 विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचं आंदोलन करता आलं नसतं. पण मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारुविक्रीचा हा अत्याचार लादला आहे.


 याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ आहे. फक्त समाजाच्या कल्याणासाठी गेली २५ वर्ष आम्ही हे काम करत आहोत. आज शासनाला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं.


उद्धव ठाकरे-अजित पवार ही ढवळ्या पवळ्याची जोडी – बंडातात्या कराडकर


बंडातात्या कराडकर पुढे म्हणाले की, “लोकांवर भयंकर असा निर्णय लादण्यात आला आहे त्यावर आम्ही नाराज आहोत. अत्यंत शांततेत आम्ही आंदोलन करत होतो. हातात काठ्या असल्याने पोलिसांचा गैरसमज झाल्याने त्यांना रोखलं होतं. काठ्या बाजूला ठेवून आंदोलन करण्यास आंदोलनाची परवानगी दिल्याने आम्ही पोलिसांचे आभारी आहोत. 


आम्हाला आधी पुढे जाऊन देणार नसल्याचं कळलं होतं. हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रुप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाइन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती कमी होईल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल”.

“उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार”


बंडातात्या यांनी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असा उल्लेख केला होता. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले की,


 “ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे”. यावेळी ढवळा कोण? पोवळा कोण? असं विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असं ते म्हणाले.  


“अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला. त्यांनीच मंदिरं खुली करायची नाहीत असं सांगितलं. हे सगळं अजित पवारांचं आहे. मी जाहीर सांगत असतो की ही सगळी मनमानी, दादागिरी..काय अजून लिहायचं असेल ते लिहा,” असंही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments