देशाची दक्षिण काशी असणाऱ्या पंढरपूर शहरात १४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पाच कोटी रुपयांची आर्थिक तरतूद : आ. समाधान आवताडे
देशाची दक्षिण काशी असणाऱ्या पंढरपूर शहरात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेसाठी १४० सी.सी.टी.व्ही . कॅमेरे बसविण्यासाठी सुमारे ५ कोटी इतक्या रकमेच्या प्रस्तावास , शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती आ . समाधान आवताडे यांनी दिली आहे .
पंढरपूर शहरामध्ये वैयक्तिक आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून , कार्ययंत्रणा उभारणीच्या अनुषंगाने , नियोजन विभागाने कार्यवाही केली आहे।दि.१२ सप्टेंबर २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार देहू , आळंदी , पंढरपूर , भंडारा डोंगर , पालखीतळ , नेवासा क्षेत्रातील मूलभूत सुविधा निर्माण करण्याच्या सुधारित आराखड्यास नगरविकास खात्याने मंजुरी दिली आहे.
मंदिर विठ्ठल परिसरासाठी यात १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.वारी प्रसंगी होणारी गर्दी , रहदारीचे नियम , याकरिता पंढरपूर शहरात विविध ठिकाणी सी.सी.टी.व्ही . कॅमेरे बसवणे गरजेचे आहे . त्यास अनुसरून या मागणीला हिरवा कंदील प्राप्त झाला आहे.
५ कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या किमतीच्या प्रकल्पासाठी , माहिती व तंत्रज्ञान व विभाग यांची मान्यता देऊन , प्रशासकीय मान्यतेचे आदेश संबंधित प्रशासकीय विभागाने निर्गमित करावे , असे आदेश दिले आहेत . त्यानुसार सदर प्रस्तावास गृहविभाग व माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने पंढरपूर शहरात ४ कोटी ९९ लाख रुपयांच्या योजनेस मान्यता दिली आहे .
पंढरपूर शहरामध्ये आषाढी , कार्तिकी , माघ व चैत्र एकादशीच्या वारकर्यांची होणारी अनुषंगाने गर्दी , रहदारीचे नियम , संशयास्पद व्यक्तींच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी , सदर निरीक्षणप्रणाली असणे गरजेचे असल्यामुळे , आ .समाधान अवताडे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या हितास प्राधान्य देऊन , जिल्ह्याचे आ.प्रशांत परिचारक यांच्या सहकार्याने वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे , या मागणीस यश प्राप्त झाले आहे .

0 Comments