सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 22 कोटी 29 लाख पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरु - आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला प्रतिनिधीसांगोला तालुक्यातील शेतकर्यांनी सन २०२१-२२ वर्षात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेमधून खरीप मृग बहार साठी उतरलेल्या फळपिकांच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरु झाली असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली
सांगोला तालुक्यातील ९ महसूल मंडळ मधील एकूण १११४३ शेतकऱ्यांनी ८६५६.६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 22 कोटी 29 लाख पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरु झाली आहे हातीद सर्कल मधील १००१ शेतकऱ्यांनी ७६०.४३ हेक्टरवरील फळपिकांचा विमा भरला होता
त्यांना १ कोटी ३४लाख रुपये विम्याची रक्कम १७७०० प्रमाणे जमा होण्यास सुरु झाली आहे कोळे महसूल मंडळातील११५२ शेतकऱ्यांनी ८८८.३५ हेक्टरवरील फळपिकांचे विमे भरले होते १ कोटी ५७लाख विम्याची रक्कम हेक्टरी १७७०० प्रमाणे जमा होण्यास सुरु झाली आहे नाझरे महसूल मंडळातील ३३२१ शेतकऱ्यांनी २५२१.३१ हेक्टरवरील फळपिकांचे विमे काढले होते
त्यांना ७ कोटी ४३ लाख२९५०० प्रमाणे विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरु झाली आहे सांगोला महसूल मंडळातील १८१७ शेतकऱ्यांनी १३८९.०३ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांची विमे काढले होते त्यांना१ कोटी ६३ लाख रुपये हेक्टरी११८०० प्रमाणे जमा होण्यास सुरु झाली आहे शिवणे महसूल मंडळांमधील २७०० शेतकऱ्यांनी २२९४.२७ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे विमे काढले होते
त्यांना ९कोटी ३५लाख पिक विम्याची रक्कम हेक्टरी ४०८०० प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरु झाली आहे सोनंद महसूल मंडळ मधील११४७ शेतकऱ्यांनी८०२.६८ हेक्टर क्षेत्रावरील फळ पिकाचे विमा भरले होते त्यांना ९४लाख रुपये हेक्टरी ११८००प्रमाणे जमा होण्यास चालू झाली आहे.सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच संपूर्ण अनुदान जमा होईल.
महूद, संगेवाडी, जवळा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पावसाचे ट्रिगर लागू न झालेमुळे पिकविमा मंजूर झाला नाही या ही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्नशील आहे असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

0 Comments