सोलापुरात २२ केंद्रांवर एम.पी.एस.सी.(M.P.S.C.) परीक्षा | पोलीस उपायुक्तांनी काढले हे आदेश
सोलापूर :(प्रतिनिधी) :-राज्यभरात रविवारी एम.पी.एस.सी.च्या पूर्व परीक्षा होणार आहेत.
सोलापूर शहरात २२ केंद्रांवर ही परीक्षा होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर यांनी प्रतिबंधित आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
मुंबई यांचेमार्फत राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-२०२१ ही रविवार दिनांक २३/०१/२०२२ रोजी सकाळी १०.०० वा. ते दुपारी १२.०० वा.
व दुपारी १५.०० वा. ते सायं. १७.०० वा.
पर्यंत सोलापूर शहरातील एकूण २२ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहय उपद्रव कमी करणे परीक्षार्थीना कसलाही अडथळा होऊ नये या दृष्टीने परीक्षेसाठी संबंधित नसलेल्या व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास पायबंद करणे तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स, फॅक्स, इ मेल, रेडिओ, इंटरनेट सुविधा भ्रमणध्वनी (मोबाईल), संगणक गणनायंत्र (कॅल्क्युलेटर) व अशा इतर प्रकारच्या स्वरुपातील बाबी विद्यार्थांना पुरवठा करण्यात येवू नये.
आणि सर्व संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना त्याचे परीक्षेशी संबंधित कर्तव्ये चोखपणे आणि कोणताही अडथळा अथवा उपद्रव न होता बजावता यावे म्हणून परीक्षा केंद्राच्या सभोवताली १०० मीटर परीसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करणे आवश्यक आहे.
प्राप्त परिस्थितीनुरूप त्वरीत एकतर्फी आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे,
अशी माझी खात्री झाली आहे.
त्याअर्थी मी बापू बांगर, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) सोलापूर शहर, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्राप्त अधिकारांचा वापर करून उक्त परिक्षा केंद्राचे १०० मीटरच्या परिसरात खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे.

0 Comments