google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एसटीचे स्टेअरिंग हाती घेण्यास होमगार्ड्स तयार -

Breaking News

एसटीचे स्टेअरिंग हाती घेण्यास होमगार्ड्स तयार -

 एसटीचे स्टेअरिंग हाती घेण्यास होमगार्ड्स तयार 


एसटी महामंडळाचे जवळपास ६५ हजार कर्मचारी आजतागायत संपात आहेत. यामुळे राज्यातील एसटी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. महामंडळाचे आर्थिक नुकसान आणि थांबलेली प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी एसटी बसेसचे स्टेअरिंग होमगार्डच्या हाती द्या. त्यासाठी राज्यभरात ४ हजार जवान तयार आहेत, अशी मागणी होमगार्ड विकास समितीद्वारे परिवहन मंत्र्यांकडे करण्यात येत आहे.


एसटी संपाबाबत अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. सोमवारी (ता. १७) रोजी कामगार न्यायालयाकडून एसटी संप पुन्हा बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे. तर, दुसऱ्या बाजूला महामंडळाकडून खासगी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करत वाहतूक पूर्ववत केली जात आहे. परंतु संपकरी कर्मचारी अद्याप एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागण्यांसाठी ठाम आहेत. 


अद्याप संप मिटला नसून तोपपर्यंत राज्य शासनाला मदत करण्यासाठी गृहरक्षक दल (होमगार्ड) तयार आहेत. गृहरक्षक दलाच्या महासमादेशकांनी आदेश काढले तर राज्यातील ४ हजार होमगार्ड जवान लालपरी चालवण्यास तयार आहेत. या जवानांकडे अवजड वाहन चालवण्याचा परवानादेखील आहे. देशात, राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर होमगार्डची नेमणूक करावी, अशी तरतूद आहे. त्यामुळे आम्ही कर्तव्य समजून राज्य शासनाला मदत व्हावी, म्हणून बसेस चालवायला तयार आहोत. त्यासाठी शासनाने आदेश काढावा. याची आम्ही वाट पाहत आहोत असा होमगार्ड संघटनेने दावा केला आहे.


जवानांकडे अवजड वाहतुकीचा परवाना


राज्यात ४ हजार जवानांकडे अवजड वाहतुकीचा परवाना आहे. शासनाकडून आदेश आल्यास आम्ही त्वरीत हजर होऊ. यासाठी गृहमंत्री, परिवहन मंत्री आणि महासमादेशकांना निवेदन पाठवणार आहोत. आम्हाला संधी द्यावी.


• नितीन गुणवंत, अध्यक्ष, होमगार्ड विकास कार्य समिती

Post a Comment

0 Comments