google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक | पंढरपुरात सावकारी जाचातूनच युवकाची आत्महत्या

Breaking News

धक्कादायक | पंढरपुरात सावकारी जाचातूनच युवकाची आत्महत्या

 धक्कादायक | पंढरपुरात सावकारी जाचातूनच युवकाची आत्महत्या



पंढरपूर :  शहरातील अनिलनगर येथे संतोष साळुंखे नामक तरुणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी, धक्कादायक खुलासा बाहेर आला असून , ही आत्महत्या सावकारी जाचातूनच झाली असून, या प्रकरणी एका संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.   



अनिलनगर भागात घडलेल्या या घटनेत संतोष प्रकाश साळुंखे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .संतोष याचे वय २६ वर्षाचे होते . अनिल नगर परिसरात म्हसोबा मंदिराच्या जवळ राहणार्‍या संतोष साळुंखे याने छताला साडी बांधून फास घेतला आहे. स्वप्निल टमटम यांनी या घटनेची खबर पंढरपूर शहर पोलिसांना दिल्यानंतर, पोलिसांनी या घटनेची नोंद करून, पुढील कार्यवाही सुरू केली होती .



सदर आत्महत्या कशासाठी केली, याचे नेमके कारण समोर आले नव्हते, पण पोलीस तपासात व्यस्त होते . सदर आत्महत्या ही सावकारी पाशातून झाल्याची चर्चा सुरू होती . पण ठोस काहीही पुढे येत नव्हते. अखेर याबाबत बरीच माहिती समोर येऊ लागली असून , सावकारी दहशतवादाने संतोषचा बळी गेला असल्याचे निष्पन्न होऊ लागले आहे.



 पंढरपूर शहरात बेकायदा सावकारी आधीपासूनच बोकाळली आहे. पण त्यास वाचा फुटत नाही, आणि प्रकरणे बाहेर येत नाहीत .या घटनेबाबत मात्र आत्महत्या झाल्याने ,आरोपीच्या नावासह फिर्याद देण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या संतोष साळुंखे याला सावकाराने दिलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासातून, ही आत्महत्येची घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सावकाराने संतोष साळुंखे यांचे घर बळजबरीने लिहून घेतले होते, 



आणि त्याला मारहाणही करण्यात आली होती ,अशी धक्कादायक माहिती फिर्यादीत समोर आली आहे .मयत संतोष याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या सुसाईड नोटमध्ये संतोष यांनी आरोपींची नावे आणि आत्महत्येचे कारण लिहिले असल्याने आत्महत्येचे बाहेर आले आहे.  



मयत संतोष साळुंखे याचा भाऊ पांडू प्रकाश साळुंखे, यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, शेखर दत्तात्रय कुंदुरकर, त्याची बहीण सुवर्णा अंकुश बिडकर, सुवर्णाचा पती अंकुश रामा बिडकर यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार शेखर दत्तात्रय कुंदूरकर यास पोलिसांनी अटक केली आहे. मयत संतोष साळुंखे यांनी आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते . सदरची रक्कम व्याजासह परत करण्यात आली होती. तरीही आरोपीने संतोषकडे जादा व्याजाची मागणी केली,



 आणि वसुलीसाठी संतोष यास मारहाण करून, घरच्या लोकांना मारून टाकतो अशी धमकी दिली. मयत संतोष साळुंखे यांच्याकडून घराची विक्री केल्याची नोटरी जबरदस्तीने करून घेतली. यामुळे संतोष यास मानसिक तसेच शारीरिक त्रास झाला, यातूनच त्याने आत्महत्या करण्याची घटना घडली अशाप्रकारची फिर्याद देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments