नाझरा विद्यामंदिर प्रशाला येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सूर्यनमस्कार उपक्रमाला सुरुवात
नाझरा (वार्ताहर):- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत 75 कोटी सूर्यनमस्काराची राष्ट्रवंदना देण्यास आज पासून नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात प्रारंभ केला. यासाठी शाळेतील काही विद्यार्थी गाईड व व प्रशालेचे प्रशिक्षक क्रीडाशिक्षक सी.डी.जगताप यांनी मार्गदर्शन केले.
75 कोटी सूर्यनमस्काराच्या संकल्प दिवसाची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रारंभी थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना प्रशालेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments