google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केंद्रीय मंत्री ना मा.नारायण राणे यांचा भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या हस्ते सत्कार

Breaking News

केंद्रीय मंत्री ना मा.नारायण राणे यांचा भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या हस्ते सत्कार

 केंद्रीय मंत्री ना मा.नारायण राणे यांचा भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या हस्ते सत्कार 


सांगोला /प्रतिनिधी ) ;  नुकत्याच पार पाडलेल्या सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री ना.मा.नारायण राणे साहेब यांनी चेअरमन पदासह बँकेवर वर्चस्व राखल्याने सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी फेटा , शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सत्कार केला.



 यावेळी सोलापूर जिल्हा भाजपला संपूर्ण ताकद देणार असल्याचे ना. मा.नारायण राणे साहेब यांनी सांगितले .देशमुख यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले . 


आपल्या खात्यातील सर्व अधिकाऱ्यांना जिल्ह्यात नवीन छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी तरुणांना सहकार्य करण्याच्या समक्षच बोलावून सूचना दिल्या . नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक निर्माण करण्याचा सल्ला दिला . त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या केंद्रातील उद्योग मंत्री असलेल्या ना.नारायण राणे यांच्याबद्दल जिल्ह्याच्या अपेक्षा वाढल्या असल्याचे देशमुख म्हणाले . 



यावेळी भाजपचे राज्य नेते संतोष  अण्णा पाटील , भाजप किसान मोर्चाचे राज्याचे कोषाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख , माजी आमदार शाम सावंत आदी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments