google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बापूसाहेब ठोकळेंनी संवैधानिक मार्गाने बहुजन चळवळ यशस्वी केली : डॉ. बाबासाहेब देशमुख

Breaking News

बापूसाहेब ठोकळेंनी संवैधानिक मार्गाने बहुजन चळवळ यशस्वी केली : डॉ. बाबासाहेब देशमुख

 बापूसाहेब ठोकळेंनी संवैधानिक मार्गाने बहुजन चळवळ यशस्वी केली : डॉ. बाबासाहेब देशमुख


सांगोला : बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर आंदोलने करून लढा दिला आहे. रस्त्यावरच्या आंदोलनातून विविध प्रश्न सोडविण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच राजर्षी शाहू महाराज समाजसेवा पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले असल्याचे प्रतिपादन पुरोगामी युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले.


प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सावे (ता. सांगोला) येथे सावे ग्रामस्थांच्यावतीने बापूसाहेब ठोकळे यांना राजश्री शाहू महाराज सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी पोलिस उपायुक्त भरत शेळके, संतोष देवकते, प्रवीण पगारे व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भारताचे संविधान शाल श्रीफळ देऊन बापूसाहेब ठोकळे यांचा सत्कार संपन्न झाला.


यावेळी बोलताना युवा नेते बाबासाहेब देशमुख म्हणाले बापूसाहेब ठोकळे हे गेली अनेक वर्ष सांगोला तालुक्यातील बहुजन समाजाचे प्रश्न घेऊन रस्त्यावरची लढाई लढत असताना विविध आंदोलन त्यांनी यशस्वी केलेले आहेत. अशा या युवा नेत्याला राजश्री शाहू महाराज सामाजिक सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटतो. सर्वांना समान न्याय हक्क व अधिकार या देशात देण्याचं काम भारतीय संविधानाने केले आहे.



भारतातील सर्व जाती, धर्म, पंथ यांना मताच्या अधिकारातून राजा घडवण्याचं काम संविधानाने केले आहे. हे संविधान घराघरात पोचवण्याचे काम आज भरत आण्णा शेळके व त्यांची टीम संविधान घरोघरी या योजनेतून करत आहेत.


बापूसाहेब ठोकळे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, राजाच्या आणि राणीच्या पोटातून आज राजा जन्माला येत नाही तर संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून मतातून आज राजा निवडण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. सर्व भारतीयांनी संविधानाचे वाचन करावं संविधानाचे पालन करावं.


भारतीय संविधान हे आपलं कवच-कुंडल आहे आणि या कवचकुंडलाच्या माध्यमातून भारतातील दीन दलित, श्रमिक, कष्टकरी मागासवर्गीय बहुजन यांना न्याय हक्क व अधिकार व समान न्याय मिळण्याच काम भारतीय संविधानाने केले आहे. ते संविधान वाचवण्यासाठी ते संविधान घराघरात पोहोचविण्यासाठी व इलेक्ट्रॉनिक मतपेटी या अधिकारापासुन आपणाला या ठिकाणी संविधानाच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे.


तरी ईव्हीएमचा वापर बंद झाला पाहिजे व मतपेटीतूनच या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडला गेला पाहिजे. यासाठी येणाऱ्या आयुष्यात संपूर्ण आयुष्यभर ही मोहीम राबवणार आहे. तरी बहुजन बांधवांनी सर्व जाती-धर्माच्या बंधूनी मला या अंतिम लढाईत साथ द्यावी.


सावे ग्रामस्थांनी सत्कार केलेला आहे त्या सत्काराचा सन्मान मी करतो व आपणा सर्वांचा ऋणानुबंध कायम राहील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावे पंचक्रोशीतील व सावे गावातील तमाम चळवळीतील कार्यकर्ते नेते यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments