google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

Breaking News

विज्ञान महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

 विज्ञान महाविद्यालयामध्ये  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न


          पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर संलग्नित विज्ञान महाविद्यालय सांगोला .येथे सोलापूर विद्यापीठामध्ये गुणवत्ता संपादित केल्याबद्दल सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, संस्था सदस्य मा. चंद्रकांत दादा देशमुख, 



संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे, संस्था सदस्य प्रा . दिपकराव खटकाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे मार्गदर्शक मा. चंद्रकांत दादा देशमुख म्हणाले की, सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला उज्वल अशा यशाची परंपरा आहे. 



आज पर्यंत या संस्थेमध्ये असंख्य विद्यार्थी दहावी ,बारावी व सोलापूर विद्यापीठांमध्ये चांगली मार्क्स मिळवून तालुक्याचे नाव, महाविद्यालयाचे नाव उज्वल करत आहेत. ही संस्था गरीब ,श्रमिक, शोषित घटकातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. 



सांगोला तालुक्यातील विद्यार्थी हा उद्योग,-व्यापार, व्यवसाय, नोकरी यामध्ये परिपूर्ण असला पाहिजे तसेच माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी उत्तुंग भरारी घेतली पाहिजे याच भूमिकेतून या संस्थेने ,



 विज्ञान महाविद्यालयाने कोल्हापूर विद्यापीठ व सोलापूर विद्यापीठ यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे .याचा मनस्वी आनंद होत आहे. इथून पुढेही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण अंगाने परिपूर्ण विकास झाला पाहिजे असा आशावाद त्यांनी महाविद्यालयाकडून व्यक्त केला.



 सोलापूर विद्यापीठामध्ये गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

           कार्यक्रमाचे अध्यक्ष सां. ता. शे. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. विठ्ठलराव शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतात की, 



या संस्थेला कै. गणपतरावजी देशमुख यांच्या विचाराचा वारसा आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच ही संस्था कार्यरत आहे. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची सर्वांगीण जबाबदारी ही महाविद्यालय घेत असते या ठिकाणचा शिक्षक प्राध्यापक घेत असतो.  पालक या नात्याने विद्यार्थ्यांच्या सर्व अडीअडचणी ह्या सोडवल्या जातात. 



विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढीला लागेल यासाठी संस्था सदस्य, प्राचार्य, शिक्षक नेहमीच कार्यान्वयित असतात हे या सोलापूर विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांच्या मार्क्स वरून व त्यांच्या गुणवत्तेवरन सिद्ध होते .संस्था स्थापन झाल्यापासून कै. गणपतराव देशमुख यांची इच्छा असे 



की तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत आर्ट्स ,सायन्स, व माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान पोहोचले पाहिजे ती आज विद्यार्थ्यांनी सांगोला तालुक्याचे व विज्ञान महाविद्यालयाचे नाव सोलापूर विद्यापीठांमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. विज्ञान महाविद्यालयामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी जे ज्ञान दिले त्यातून त्यांचे आयुष्य घडवले त्यांना जगण्याची दिशा दिली ही निश्चितच येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक आहे .



असे मला वाटते. इथून पुढेही विज्ञान महाविद्याल सोलापूर विद्यापीठामध्ये गुणवत्तेच्या बाबतीत यशाची परंपरा कायम ठेवलअसा मला आशावाद आहे. महाविद्यालयाला संस्थेकडून सर्वतोपरी मदत ही केली जाईल परंतु आजचा विद्यार्थी हा माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात टिकला पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

            



पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ  सोलापूर, शैक्षणिक वर्ष2020_21 मध्ये बी ए भाग तीन_ इंग्रजी विषयांमध्ये कु. रूपाली मोहन बनकर हिने 84.97% मार्क्स मिळवून सोलापूर विद्यापीठामध्ये इंग्रजी विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. व विद्यापीठाचे गोल्ड मेडल प्राप्त केले. 



कर्मयोगी माजी आ. श्री. सुधाकरपंत परिचारक सुवर्णपदक मानांकन प्राप्त केले. तसेच शिवकुमार सिद्रमाप्पा कोनापुरे सुवर्णपदक,  मिळवले. त्याबद्दल संस्था सदस्य मा. चंद्रकांत दादा देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प, हार देऊन रूपाली मोहन बनकर यांचा सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 



श्री. दर्याबा कृष्णा इमडे एम ए भाग 2 मध्ये स्व. निशा कारखानीस सुवर्णपदक प्राप्त केले. सोलापूर विद्यापीठामध्ये एम ए भाग दोन मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवल्याबद्दल संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प, हार देऊन सत्कार करण्यात आला. 



कु. प्रियंका प्रल्हाद पवार हिने संख्याशास्त्र या विषयांमध्ये सुलभा शंकर पांडे यांच्या स्मरणार्थ सुवर्णपदक प्राप्त केले.  कु. प्रियंका प्रल्हाद पवार हीचा सत्कार संस्था सदस्य प्रा. दिपकराव खटकाळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प, हार देऊन करण्यात आला. या तीन विद्यार्थ्यांचे संस्था सदस्य यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



            पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ , सोलापूर येथे विज्ञान महाविद्यालयातील या तिन्ही विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवले परंतु या यशाच्या पाठीमागे त्यांचे आई-वडील ही असतात. तसेच त्यांना शिकवणारे प्राध्यापक शिक्षक हे असतात इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. पांडुरंग रुपनर प्रा. कैलास सगरे उपप्राचार्य व 



संख्याशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रमुख प्रा . विजय कुमार घाडगे यांचाही, शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला ,सोबतच सत्कार मूर्ती विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा ही  शाल ,श्रीफळ, गुलाब पुष्प, हार देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व महाविद्यालयाच्या गुणवत्तेची माहिती 



महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथ राव फुले यांनी केले सूत्रसंचालन प्रा. डॉ. किसन माने यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा. विजय कुमार घाडगे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग ठेवून पार पाडण्यात आला.

Post a Comment

0 Comments