लाल परी धावू लागली : सोलापुरात 500 एसटी कर्मचारी कामावर रुजू
सोलापूर शहर व जिल्ह्यातील एसटी आगारांमध्ये संपावर गेलेले कर्मचारी कामावर परतू लागल्याने एसटी बसेस पुन्हा धावत आहेत. जिल्ह्यात 500 कर्मचारी कामावर परतले असून यात एसटी वाहक व चालकांचा समावेश आहे.
यापूर्वीच तांत्रिक विभागातील 80 टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून शासन विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटीतील चालक, वाहक व तांत्रिक विभागातील कर्मचारी आंदोलन सुरू केल्याने एसटी प्रवास थांबला होता.
शासनाने कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा सुरू केली असून या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील चार हजार कर्मचाऱ्यांपैकी 1200 कर्मचारी आतार्यंत कामावर रुजू झाले आहेत. यात एसटीचालक व वाहकांचा समावेश आहे. यापूर्वीच तांत्रिक विभागातील 80 टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
शहरात व ग्रामीण भागात एसटी पुन्हा धावू लागली असून अक्कलकोट आगारातून अनेक ठिकाणी गाडय़ा सोडण्यात आल्या. सोलापूर आगारातून दिवसभरात 30 हून अधिक फेऱ्या झाल्या आहेत. तर करमाळ्यात 40 कर्मचारी हजर झाले असून एसटीच्या आठ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. तर अक्कलकोटमध्ये 22 कर्मचारी हजर झाले असून दोन मार्गांवर एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन आगारप्रमुखांनी केले आहे.
कोपरगाव आगारातून बससेवा सुरू झाली असताना एसटी बसवर हल्ले झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. वैजापूर-कोपरगाव ही एसटी बस दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान कोपरगाव बसस्थानकातून वैजापूरला जाण्यासाठी निघाली होती.
एक किलोमीटर अंतरावर बिरोबा चौक, वडांगळे वस्तीसमोर दुचाकीवर आलेल्या दोघांनी बसवर दगडफेक केली. यावेळी चालक एस. एस. गायकवाड आणि वाहक एस. के. भागवत तसेच 13 प्रवासी प्रवास करत होते. बसवर दगडफेक करून दोन्ही हल्लेखोर पसार झाले आहेत.
या हल्ल्यात चालक जखमी झाला आहे. दुसरीकडे कोपरगाव आगाराची बस आरटीओ कामासाठी कोपरगावहून श्रीरामपूरकडे जात असताना गोदावरी पुलाजवळ अज्ञाताने बसवर दगडफेक केली. चालक सानप आणि वाहक गरकल यांनी या घटनेची माहिती तातडीने आगारप्रमुख अभिजित चौधरी यांना दिली.
0 Comments