धक्कादायक! बायको नांदायला येईना म्हणून मंगळवेढ्यातील 'नवरोबाने' केले विष प्राशन
पत्नी नांदायला येईना म्हणून सासरवाडीला गेलेला तरूण रागाने आपल्या अवघ्या ४ महिन्याच्या मुलीला घेऊन आला.
मात्र, पोलिसांच्या मदतीने पत्नी पाठलाग करीत आलेली दिसताच त्याने येथील सरगम चौकात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.
नितीन नागनाथ सपताळे (रा.रेड्डे ता.मंगळवेढा, सध्या रा.लोखंडे वस्ती इसबावी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नांव आहे.
नितीन याची पत्नी शुभदा ही कांही दिवसांपासून माहेरी करकंब येथे राहते. रविवारी नितीन हा तिच्याकडे गेला होता त्यानंतर रात्री अचानक तो ४ महिन्याच्या मुलीला घेऊन गेला.
या प्रकारानंतर मुलीला पती काहीतरी बरेवाईट करेल या भितीने पत्नी शुभदा हिने करकंब पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.
घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांनी नितीन याचे मोबाईल लोकेशन काढले. त्या आधारे पोलीस पथकाने सुभदा व तिचा चुलत भाऊ विकास उर्फ गणेश शिंदे यांच्यासह त्याचा पाठलाग सुरू केला.
नितीन हा मुलीला घेऊन अनवली फाटा, गोपाळपूर व नंतर पंढरपूर शहरात आला. सरगम चौक येथे पोलिसांनी त्याला गाठले. या ठिकाणी नितीन हा थांबताच पत्नी शुभदा त्याच्याकडे गेली.
त्यावेळी तो मोटारसायकलवरून उतरून एका कारमध्ये बसला. पत्नीला पाहताच त्याने ‘तू नांदायला का येत नाही’ , असे म्हणत खिशातून बाटली काढून विषारी औषध प्राशन केले.
तो उलट्या करू लागल्या तात्काळ पोलिसांनी त्याला त्याच कारमधून येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द पोलीस नाईक बापूसाहेब मोरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
0 Comments