google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राष्ट्रीय कराटे स्पर्धेत स्वप्निल सेल्फ डिफेन्स कराटे अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश

Breaking News

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत स्वप्निल सेल्फ डिफेन्स कराटे अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश

 राष्ट्रीय कराटे स्पर्धेत स्वप्निल सेल्फ डिफेन्स कराटे अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश


सांगोला(प्रतिनिधी): गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सांगोला येथील स्वप्निल सेल्फ डिफेन्स कराटे अकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत महाराष्ट्राने 13 सुवर्ण, 9 रौप्य आणि 8 कांस्य पदकाची कमाई केली. त्यामध्ये स्वप्निल सेल्फ डिफेन्स कराटे अकॅडमीच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण,3 कांस्य, 4 रौप्यपदक मिळविले.



यामध्ये ओंकार बाळासो लवटे, ऋतुजा रोहिदास शिंदे, अक्षदा गोरख नकाते यांनी सुवर्ण पदक मिळविले. ऋतुराज रोहिदास शिंदे, ओम गोरख नकाते, सायली विठ्ठल केदार यांनी रौप्यपदक तर कृतिका कुंडलिक केदार, साहिल विजय ढगे, पियुष दर्याबा गावडे, योगेश सचिन शिंदे यांनी कांस्य पदक आपल्या नावावर केले.



सर्व यशस्वी खेळाडूंना श्रीकांत पुजारी सर, भीमराव बाळगे सर, इकबाल शेख सर यांचे व प्रशिक्षक म्हणून रामचंद्र कर्णवर सर यांचे मार्गदर्शन लाभले.



यशस्वी खेळाडूंचे शामराव लिगाडे विद्यालय अकोला वासुद व अकोला गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments