सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथील धक्कादायक घटना ..
रस्त्याच्या कडेला थांबलेल्या बालकाला टॅक्टरने चिरडले , बालकाचा मृत्यू
सांगोला ट्रॅक्टर चालकाने अविचाराने , रोडची परिस्थिती लक्षात न घेता वेगाने चालवून रोडच्या कडेला थांबलेल्या बालकाला धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन मरण पावल्याची घटना वाकी शिवणे ( ता . सांगोला ) येथे ३१ डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे .
संग्राम आप्पासाहेब शेजाळ ( वय ८ वर्षे , रा वाकी शिवणे , ता . सांगोला ) या बालकाचा अपघातात मृत्यू झाला आहे . याबाबत हकीकत अशी की , ३१ डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास संग्राम शेजाळ हा शेताच्या समोर वाकी शिवणे ते कुंभार मळा कच्चा रोडचे काम चालू असलेल्या रोडवर सायकल खेळत रोडच्या कडेला थांबला होता .
त्यावेळी अचानक वाकी शिवणे गावाकडून एक लाल रंगाचा ट्रॅक्टर वेगात येऊन त्याने रोडच्या कडेला सायकलसह थांबलेल्या संग्राम शेजाळ या बालकास जोरात धडक दिली . ट्रॅक्टरचे चाक बालकाच्या कंबरेवरून गेल्याची त्याला सुरुवातीला सांगोला नंतर पंढरपूर व सोलापूर येथे उपचारासाठी घेऊन गेले असताना सोलापूर येथे उपचारापूर्वीच निधन
झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . याबाबत ट्रॅक्टर चालक राहुल शहाजी हांडे ( रा . वाकी शिवणे , ता . सांगोला ) याने अविचाराने , हयगयीने रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालवल्यामुळे झाल्यामुळे सतीश वसंत शेजाळ ( रा . वाकी - शिवणे , ता . सांगोला ) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे .
0 Comments