अखेर सांगोला पं.स. शिक्षण विभागास मिळाले गटशिक्षणाधिकारी
सांगोला दि.19: सांगोला पंचायत समितीच्या शिक्षण विभागास गेल्या अनेक दिवसापासून गटशिक्षणाधिकारी हे प्रभारी होते. विस्तार अधिकारी हेच तात्पुरते गटशिक्षणाधिकारी म्हणुन पदभार सांभाळत होते. आज दिनांक 18 जानेवारी रोजी पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी महारुद्र बाजीराव नाळे यांना सांगोला पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार दिल्याने आता
सांगोला पंचायत समितीस गटशिक्षणाधिकारी मिळाले आहेत.योग्य अधिकारी मिळाल्याने आता शिक्षकांची व शिक्षण विभागाची कामे विनाअडथळा होणार आहेत. महारुद्र नाळे साहेबांचा विविध संघटनेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यतत्पर अधिकारी म्हणुन त्यांची ख्याती आहे.
0 Comments