डोंगरगांव येथील सुभाबाई काळे यांचे निधन
डोंगरगाव ता.सांगोला येथील सुभाबाई महादेव काळे यांचे काल रविवार दि.02 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 90 वर्ष होते.
प्रेमळ व मनमिळावू स्वभावामुळे त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
जि.प्र.शाळा चांडोलेवाडी येथील शिक्षक संजय महादेव काळे यांच्या मातोश्री व जि. प्र.शाळा कमलापुर येथील सहशिक्षिका वंदना सुरवसे काळे मॅडम यांच्या सासू होत्या. त्यांच्या पश्चात 5 मुले, सूना, 18 नातवंडे असा मोठा परिवार आहे.
तिसऱ्या दिवसाचा विधी मंगळवार दि. 4 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता डोंगरगाव येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
0 Comments