google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : मातंग समाजाचे कार्यकर्ते चढले रेल्वे स्टेशनच्या 'टेरेसवर' | जोरदार घोषणाबाजी

Breaking News

सोलापूर : मातंग समाजाचे कार्यकर्ते चढले रेल्वे स्टेशनच्या 'टेरेसवर' | जोरदार घोषणाबाजी

सोलापूर : मातंग समाजाचे कार्यकर्ते चढले रेल्वे स्टेशनच्या 'टेरेसवर' | जोरदार घोषणाबाजी


 सोलापूरच्या रेल्वे स्थानकाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  यांचे नाव द्यावे यासाठी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या  वतीने करण्यात आले.सोलापूर : सोलापूरच्या रेल्वे स्थानकाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी सोलापुरात सध्या जोर वाढला आहे.



 मातंग समाजातील युवा कार्यकर्ते या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रविवारी सकाळी सोलापूर रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातील टेरेसवर चढून कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली. रेल्वे स्थानकाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे  नाव देण्याकडे लक्ष वेधण्यात आले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची एकच धावपळ झाली होती.



सोलापूरच्या रेल्वे स्थानकराज्यभर नामांतर आंदोलन उभे करणार -डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा युवक अध्यक्ष पृथ्वीराज मोरे  आणि सोहम लोंढे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी हे आंदोलन केले. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रभर नामंतर आंदोलन उभे करणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली. सोलापूर रेल्वे स्थानकाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे.



 हा आंदोलना मागील मुख्य उद्देश आहे. असे डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रदेश युवक अध्यक्ष सोहम लोंढे यांनी माध्यमांना सांगितले.सोलापूर रेल्वे स्थानकाच्या नामांतरसाठी रेल रोको आंदोलन करणार-सोलापूर रेल्वे स्थानकाला साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे याबाबत मागणी गेल्या दहा वर्षांपासून केली जात आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत प्रमुख भूमिका बजावली होती. 



त्यामुळे सोलापूर रेल्वे स्थानकाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव दिले, तर मातंग समाजाला न्याय मिळेल.अशी मागणी करत सोलापूर रेल्वे स्थानकावर चढून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकऱ्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे फलक लावले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ झाली होती. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे

Post a Comment

0 Comments